Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्या सुद्धा. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. एका वाघाने हरण, कोल्हा, झेब्रा नाही तर एका माकडाशीच पंगा घेतला. झाडावर चढण्याच पटाईत असणारा माकडाची शिकार करण्याचा डाव फसला की माकड जाळ्यात अडकलं हे तुम्हीच पाहा. माकडाने अशी कुठली चूक केली ज्यामुळे त्याची शिकार झाली? हे पाहूया.
‘शिकार करो या शिकार बनो’
जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षण मोठा संघर्ष करावा लागतो, थोडीशी बेफिकरीही त्याच्या जीवावर बेतते. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिबट्याने झाडावर चढून माकडाच्या पिल्लाची शिकार केल्याची ही घटना समोर आली आहे. बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्यानं माकडाच्या पिल्लाची शिकार केली. आश्चर्याची बाब म्हणजे ही शिकार बिबट्याने माकडाची शिकारी केवळ काही सेकंदात त्याची शिकार केली. बिबट्याचा हा वेग पाहता कोणी म्हणेल नजर हटी दुर्घटना घटी…मिळालेल्या माहितीनुसार ही घटना उत्तराखंडमधील राजाजी नॅशनल पार्कमध्ये घडली आहे.
एक चूक अन् खेळ खल्लास
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता बिबट्यानं एका उडीत या पिल्लाला पकडलं. अन् पुढे या पिल्लाचं काय झालं असेल हे वेगळं सांगायला नको. माकडाच्या चेहऱ्यावरील भितीच सर्वकाही सांगून जातेय. जंगलात वाघ आणि बिबट्या यांचा आसपास वावर असेल तर त्याची सर्वात आधी चाहूल माकडांना लागते. मात्र हे पिल्लू लहान असल्यानं त्याला स्वत:चा बचाव करता आला नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच सशानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
हा फोटो @Saket_Badola या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोला “जंगल हे अत्यंत निर्दयी असतं असं म्हटलं जातं. कारण इथे जिवंत राहण्यासाठी तुम्हाला दररोज संघर्ष करावा लागतो” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.