Shocking video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला कधी भीती वाटली असेल तर कधी हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. त्यात बिबट्या हा अत्यंत चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीतही शिकार करू शकतो. तो अत्यंत चपळ असतो. त्यामुळे वेळप्रसंगी तो पाण्यात शिरून मगरीशी देखील दोन हात करण्याची क्षमता ठेवतो. भक्ष्य कितीही उंचावर असलं तरी देखील तो अगदी सहज गतीनं उड्या मारत वर चढतो. असा खतरनाक प्राणी जर मानवी वस्तीत घुसला तर काय होईल? होय, असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधून बिबट्याची चलाखी समोर आली आहे. जखमी झाल्याचं नाटक करत बिबट्यानं लोकांवर हल्ला केला आहे.
बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांमध्ये शिरल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या घटनांमुळे भीती तर वाढत आहेच, पण वारंवार घडून येणारा बिबट्याविरुद्ध मानव हा संघर्ष चिंताजनक आहे. मानवाचा जंगलामध्ये, पर्यायाने जंगलातील व्यवस्थेमध्ये असणारा वाढता हस्तक्षेप आणि अतिक्रमणे यांमुळेच हा संघर्ष निर्माण झाला आहे.बिबट्या हा जंगलातील भयंकर शिकारी आहे. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत तो एखाद्या प्राण्याची शिकार करतो.
सोशल मीडियावर बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्याच्या कडेला पडला आहे, त्याला पाहून तो जखमी झाल्याचं दिसत आहे. हेच रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनाही वाटलं आणि ते त्याच्या मदतीसाठी पुढे गेले. यावेळी बिबट्या मात्र नाटक करत होता, दरम्यान लोक पाणी घेऊन जवळ येताच चलाख बिबट्या उठतो आणि लोकांच्या दिशेनं धाव घेतो. यावेळी काही लोक पळून जाण्यात यशस्वी होतात तर काहींवर बिबट्या हल्ला करतो.
पाहा व्हिडीओ
आजकाल धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे. रात्री, दिवसा, कोणत्याही वेळी ते बेधडकपणे येऊन लोकांवर, प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहे. त्यांच्या भितीपोटी अनेक नागरिकांनी आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दिवसेंदिवस प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये हल्ला करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.