Viral video: वन्य जीवन, वन्य प्राणी यांच्याविषयी लोकांना कायमच कुतुहूल वाटत आलं आहे. अनेकांना प्राण्यांना पाहायला, त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडतं. मात्र, प्रत्यक्षात धोकादायक प्राण्यांच्या जवळ जायला कोणालाही घाम फुटेल. प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. कधी कोणता प्राणी कोणावर हल्ला करील ते काही सांगता येत नाही. अशातच जन्माला आल्यानंतर नीट श्वासही घेतला नसताना एका हरणाच्या पिल्लाला मृत्यूला सामोरं जावं लागलंय. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राण्यांविषयी, त्यांच्या हल्ल्याविषयी कायमच अनेक व्हिडीओ समोर येत असतात. मात्र, सध्या समोर आलेल्या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ अतिशय हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये नुकतंच जन्मलेलं हरणाचं पिल्लू बिबट्याची शिकार झालंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हरिणी जंगलात पिल्लाला जन्म देत आहे. यावेळी प्रचंड वेदना सहन करून अखेर ती हरिणी पिल्लाला जन्म देते. तेवढ्याच तिथे बिबट्या आल्याने ती माता तिथून पळ काढते; मात्र ते पिल्लू तिथेच पडून राहतं. नुकताच जन्म झालेल्या त्या पाडसानं धड नीट डोळेही उघडलेले नसतात. मग त्या बिबट्याच्या तावडीतून ते बिचारं स्वत:चा बचाव तरी कसा करणार? पुढे हा बिबट्या आपल्या जबड्यात पिल्लाला उचलून घेऊन जातो.

त्याची श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया नीट चालू होण्यापूर्वीच त्या कोवळ्या पाडसाला मृत्यूला सामोरं जावं लागल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर ‘काय वाटलं असलं त्या आईला, जिच्या बाळानं जन्मत:च नीट श्वासही घेतला नाही अन् त्याला समोर मरण दिसलं’,अशी कॅप्शन लिहिलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> यात्रेतल्या प्रचंड गर्दीत कपलचे अश्लील चाळे; जमलेले लोक बघत राहिले तरीही भान नाही, संतापजनक VIDEO व्हायरल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा हैराण करणारा व्हिडिओ sawantsamadhan2022 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, ३२ हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, “हरणाच्या पिल्लासोबत खूप वाईट झालं, असं वाटतंय याला खाऊन बिबट्याचा फक्त नाष्टा होईल.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बिबट्याने किती पद्धतशीरपणे शिकार केली आहे.” आणखी एका युजरने लिहिलंय की, बिबट्या नजर आणि कान तीक्ष्ण असतात, पण त्याचे नाक तेवढेच पॉवरफूल असते.”