Leopard attack live video : सोशल मीडियावर सर्वांत जास्त कोणत्या कीर्तनकाराचे विनोदी व्हिडिओ आवडीनं पाहिले जात असतील, तर ते प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे. नेहमीच एखाद्या वक्तव्यावरून चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. सध्या त्यांच्याविषयीच्या चर्चेचं कारण कोणतं वक्तव्य नसून, ते कारण एक बिबट्या आहे. हो! आपल्या कीर्तनाच्या अनोख्या अंदाजामुळे प्रख्यात असलेल्या इंदुरीकर महाराजांच्या घरात बिबट्या घुसल्याचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर येथील त्यांच्या राहत्या घरातील हा प्रकार आहे. या बिबट्यानं त्यांच्या घरातील कुत्रा उचलल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
दबक्या पावलांनी आला अन्
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. घराच्या अंगणात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला चढवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज काही ना काही कारणामुळे कायम चर्चेत असलेले आपण पाहिले आहेत. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तनाचे कार्यक्रम राज्यभर चालू असतात. आपल्या अनोख्या शैलीत ते कीर्तन सांगतात. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या घरी बिबट्या आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे, अंगणात दोन कुत्रे बसले आहेत. त्यांच्याशिवाय बाहेर कुणीही दिसत नाही. याचदरम्यान या बिबट्याची एन्ट्री होते आणि दोनपैकी एका कुत्र्यावर हल्ला करीत तो त्या कुत्र्याला तोंडात पकडून घेऊन जातो. कुत्र्याचा आवाज ऐकून एक मुलगी घराबाहेर आल्याची यामध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> माणुसकीचं दर्शन! तरुणानं केलेलं कृत्य पाहून म्हणाल माणुसकी अजूनही जिवंत आहे; VIDEO व्हायरल
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज राहतात. याआधीही गावात बिबट्या आढळला असून, गावकऱ्यांनी या संदर्भात वन विभागाला माहिती दिली आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली असल्याचं बोललं जात आहे.