Leopard falling in well in Ratnagiri: प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्याचा रत्नागिरीतला व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ऐरवी बिबट्याला बघूनही घाम फुटतो मात्र या कोकणातल्या काकांनी चक्क बिबट्याला दम दिला आहे. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा कोकणची माणसं साधी भोळी आहेत का?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हल्ली वन्य प्राण्यांचं मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं आहे. असाच एक बिबट्या रत्नागिरीमधल्या लांजा शहरातील भरवस्तीत असणाऱ्या विहिरीत पडतो. विहिरीत पडल्यामुळे त्याला बाहेरच यायला जमत नव्हतं, बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून गावकरीही जमा झाले. यावेळी बाहेर पडता येत नसल्यानं बिबट्याही हतबल होऊन वैतागला होता. काही वेळानं माणसांना बघून बिबट्या डरकाळ्या फोडू लागला. यावेळी कोकणी काकांना या बिबट्याला चांगलाच दम दिला. काका म्हणतात “एकतर अडकलायस आणि आमच्यावरच भो काय करतोयस” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘लाडक्या बहिणीचे अन् निराधार योजनेचे पैसे एकाच वेळी आले’ आनंदानं आजी थेट डीजेवर थिरकल्या; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
mahamtb_wildlife नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास २ लाख लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एकानं म्हंटलंय “कोकणच्या माणसांसमोर बिबट्या भोळा दिसतोय.” तर आणखी एकानं “काकांचा स्वॅग”