Leopard Viral video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना दिसून येत आहे. मग या कुत्र्याला पकडून तो तब्बल १० फूट उंचीचा गेट ओलांडून पळून जातो. ही घटना एका घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहूनच लोकांच्या मनात धडकी भरताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर युजर्सच्या अनेक कमेंट्स येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ छतरपूरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्याची पुष्टी अद्याप झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक कुत्रा गेटच्या दिशेने भुंकताना दिसून येत आहे. कदाचित या कुत्र्याला घरासमोरील आवारात लावलेल्या गेटसमोर कुणी तरी असल्याचा अंदाज आला होता. या कारणामुळे हा कुत्रा गेटच्या दिशेने पाहून जोरजोरात भुंकत होता. त्यानंतर गेटसमोर त्याने जे पाहिलं ते पाहून हा भुंकणारा कुत्रा तिथून पळू लागतो. घाबरून हा कुत्रा मागच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काही वेळात मुखाग्नी देणार तितक्यात डोळे उघडले; सरणावरच आजोबा झाले जिवंत
त्यानंतर काही वेळाने गेटवर एक भयानक बिबट्या असल्याचं दिसून येतं. घराच्या आवारात एक भक्कम असा गेटही बसवून सुद्धा हा बिबट्या या गेटवरून घराच्या आवारात घुसतो. या बिबट्याने घाबरून पळून जाणाऱ्या कुत्र्याला पाहिलेलं असल्यामुळे तो कुत्र्याच्या मागावर जातो. यापुढे व्हिडीओमध्ये फक्त गेट असल्याचं दिसून येत आहे. एका बाजूने कुत्र्याचा जोरजोरात भुंकताना आवाज ऐकू येत आहे. थोड्या वेळाने आत गेलेला बिबट्या व्हिडीओमध्ये दिसू लागतो. पण यावेळी तो भुंकणाऱ्या कुत्र्याची शिकार करून त्याचा आपल्या जबड्यात पडकून आलेला दिसतो. हा बिबट्या ज्या पद्धतीने मोठा गेट ओलांडून घराच्या आवारात घुसतो, त्याच पद्धतीने तो जबड्यात कुत्र्याला पकडत गेट ओलांडून बाहेर पळून जातो.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ डिसेंबर महिन्यातला असल्याचं सांगण्यात येतंय. ही सर्व घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. हा व्हिडीओ IFS अधिकारी Parveen Kaswan यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला. या घटनेनंतर घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी देखील आले होते. पण त्या ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे मिळाले नाहीत. यापूर्वी सुद्धा या भागात बिबट्या आढळून आला होता. त्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी सापळा देखील रचला. पण ते बिबट्याला पकडण्यात अयशस्वी ठरले.
हा व्हिडीओ सोशल मीडियाव मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात धडकी भरते. कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने तब्बल १० फूट उंचीचा गेट ओलांडला हे पाहून सारेच जण हैराण होत आहेत. लोक ही व्हिडिओ क्लिप एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.