वाघ, सिंह, बिबट्या हे जंगलाचे राजे आहेत. त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही. या प्राण्यांना सर्वात धोकादायक शिकारी देखील म्हटलं जातं. जर त्याने एखाद्याची शिकार करण्याचा निर्णय घेतला तर तो क्वचितच मागे हटतो. त्याचे पंजे इतके मजबूत असतात की ते सर्वात मोठी शिकारही सहज पकडू शकतात. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चपळाई आणि हल्ल्याचं तंत्र या बाबतीत वाघालाही मात देईल असा प्राणी म्हणजे बिबट्या. बिबट्याचा तुफान वेग आणि विलक्षण चपळाई भल्याभल्या शक्तिशाली प्राण्यांनाही हार पत्करायला लावू शकते. त्यामुळे बिबट्यानं शिकारीसाठी चाल केली, की समोरच्या प्राण्याचा खेळ खलास झालाच म्हणून समजयाचं! अशाच एका हरणाची बिबट्यानं ७ सेकंदात शिकार केली. याचा व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डबक्यात आधीच एक हरीणाचं पिल्लू पाणी पित होतं. या डबक्याशेजारी एक झाडं होतं त्यामुळे बिबट्याला ते पिल्लू दिसलं नाही. बरं, पिल्लाला बिबट्याची चाहूल लागली होती त्यामुळे ते दूर पळण्याच्या इराद्यानं मागे फिरलं. मात्र तेवढ्यात बिबट्याची नजर पिल्लावर पडली. मग काय बिबट्यानं क्षणाचाही विलंब न करता एका झडपमध्ये त्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडलं. बिबट्याच्या तावडीतून हरणाला सुटण्यास मिळाले की नाही हे स्पष्ट होत नाही. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> एक बाईक तीन तरुण अन् स्टंटबाजी; इतक्यात भरधाव ट्रक आला अन्…काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

जंगलामध्ये प्राणी एकमेकांची शिकार करुन आपलं पोट भरत असतात. ते नेहमीच आपल्यापेक्षा कमी बलवान प्राण्यांची शिकार करतात. वन्य प्राण्यांचे असे शिकारीचे अनेक व्हिडीओ आत्तापर्यंत समोर आले आहेत.सोशल मीडियावर प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात.