leopard kills crocodile viral news : रानावनात भटकणारे प्राणी तहानेनं व्याकुळ झाल्यावर पाणी पिण्यासाठी नदी किनाऱ्यावर येत असतात. पण एखाद्या तहान भागवण्याच्या इराद्याने आलेल्या प्राण्याची भूख कधी भागेल, याचा नेम नाही. कारण जंगलात फिरणारा बिबट्या पाण्याच्या शोधात एका नदीकाठी आला असता त्याला गर्द झाडीत लपलेली मगर दिसली. मगरीला बिबट्या शिकार करायला आल्याचं कळताच तिने लागलीच पाण्यात धूम ठोकली. पण चपळ बिबट्याने भर पाण्यात उडी मारून मगरीच्या मानेवर हल्ला करुन शिकार केली. हा थरारक व्हिडीओ एका बोटीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी कॅमेरात कैद केला आहे. अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नदी किनाऱ्यावर वाघ, बिबट्या, हत्ती यांसारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असतात. पण काही वेळा या हिंस्र प्राण्यांवरही मगरीने हल्ला करुन त्यांच्या जबडा खेचल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण एका चालाख बिबट्याने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला पाण्यातून खेचून बाहेर काढले आणि तिची शिकार केली. हे दृष्य कॅमेरात टिपताना पर्यटकही थक्क झाल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. बिबट्याने मगरीला एका सेकंदातच जखडून टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मगरीने बिबट्यावरही हल्ले केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

नक्की वाचा – बापरे! किंग कोब्रासोबत खेळत होता, शेपटीला हात लावताच अंगावर धावला अन्…; थरारक Video एकदा पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

एक मगर गर्द झाडीत बसलेली असते. त्याचवेळी तिच्या जवळ बिबट्या येतो. मगरीला बिबट्या शिकार करायला आल्याचं कळताच ती थेट पाण्यात उडी मारते. पण बिबट्यानेही मगरीची शिकार करण्याचा ठाम निर्धार केलेला असतो. त्यामुळे बिबट्याही थेट पाण्यात उडी मारून एका सेकंदात मगरीच्या मानेला पकडून तिला बाहेर खेचतो. बिबट्याने मगरीची केलेली थरारक शिकार या व्हिडीओत दिसत आहे. जंगलात राहणारे बिबटे अनेकदा मानव वस्तीतही मुक्त संचार करत असतात. माणसांवरही प्राणघातक हल्ले केल्याचे बिबट्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे नागरिकांना बिबट्यापासून सावध राहण्याचं आवाहन वन विभागाकडून नेहमीच करण्यात येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard kills crocodile in the river watch shocking video on instagram wild animals viral news nss