leopard CCTV Video: अनेकदा जंगलातील धोकादायक प्राणी मानवी वस्तीत येऊन हल्ला करतात. त्यात प्रामुख्याने शिकार बनतात ते पाळीव प्राणी. तर कधी कधी माणसांवर देखील बिबट्या झडप घालताना दिसतात. दिवसेंदिवस प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. धोकादायक प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे येत आहेत. त्यांचा वावर हा वाढत चालला असून याच्या अनेक घटनाही समोर येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांवरच हल्ला करत आहेत. वेगवेगळ्या भागातून या घटनांचे व्हिडीओही समोर येतायेत. नुकतीच आणखी एक घटना समोर आलीये, पुण्यातील खेड गावात मध्यरात्री एका बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे. हा शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिबट्याच्या एंट्रीने खळबळ

दिवसेंदिवस प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या हळूच घराच्या दिशेने येऊन कुत्र्याच्या शिकारीच्या प्रयत्नात होता. मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर काही कुत्रे झोपले होते, या कुत्र्यांवर हल्ला करण्यासाठी हा बिबट्या आला. यावेळी काही कुत्र्यांनी बिबट्याला पाहिलं आणि पळ काढला तर एक झोपलेला कुत्रा मात्र बिबट्याच्या तातवडीत सापडला. यावेळी कुत्र्याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी बराच प्रयत्न केला मात्र बिबट्या कुत्र्याला तोंडात पकडून तिथून घेऊन गेलाच.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: सुनेची सासऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण; तरी लोक फक्त…हरियाणात थरकाप उडवणारी घटना

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. अनेक वस्त्यांवर प्राण्यांची दहशत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कधी कोणता प्राणी घरात घुसेल काही सांगू शकत नाही. दरम्यान, यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये धोकादायक प्राण्यांने घरातील पाळीव प्राण्यांनावर हल्ला केला. एवढंच नाही तर माणसांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भितीचं वातावरण आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard kills farmers pet dog near khed pune leopard attack on dog video viral on social media srk