Viral video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली, तर सैतानालाही धूळ चाखवू शकते. मग ती आई माणसाची असो वा प्राण्याची आई ही नेहमीच आई असते. याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मादी बिबट्या थेट सिंहाशी भिडल्याचं पाहायला मिळालं. याचा थरारक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहाच्या पट्ट्यात कोणी आले तर तो वाचणे तसे कठिणच. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघ, सिंह यांच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत एका मादी बिबट्यानं केलीय.आपल्या दोन पिल्लांना वाचवण्यासाठी आई बिबट्या थेट सिंहाशी लढा देते. कॅरोल आणि बॉब या आफ्रिकन जोडप्याने टांझानियामधील सेरेनगेटी नॅशनल पार्कमधील ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. मात्र अशी हिम्मत एका बिबट्या मादीने तिच्या बाळासाठी दाखवली आहे. सिंहाच्या हल्ल्यापासून आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. या आईनं आपल्या बाळाला कसं वाचवलं ते तुम्हीच पाहा. या व्हिडीओच्या शेवटी जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंहीण जवळ येताच बिबट्याने तिच्या अंगावर उडी मारली आणि दोघांमध्ये जोरदार झुंज सुरु झाली. बिबट्या मादीने आपल्या जीवाची चिंता न करता पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर बिबट्या मादीचं रौद्ररुप पाहून सिंहीणीला पळ काढावा लागला.शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Latestsightings नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या मादी बिबट्याचं कौतुक करीत आहेत. एकानं म्हटलंय की, आई ही आईच असते. दुसऱ्या एकानं कमेंट केलीय की, आईसारखा योद्धा संपूर्ण जगात नाही. शेवटी आणखी एकानं कमेंट केलीय की, शेवटी विषय काळजाचा होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard mother sacrifices herself to protect her cubs shocking video goes viral on social media srk