Viral video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो.‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये पँथर जंगली माकडाची शिकार करताना दिसत आहे, मात्र माकडाची शिकार करण्याचा पँथरचा डाव फसला अन् पँथर तोंडावरच आपटला. पँथरला धडा शिकवण्यासाठी माकडानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगलात जंगली माकडं धावताना दिसत आहेत. अशा स्थितीत एका बिबट्याने झुडपात लपून माकडाच्या कळपावर हल्ला करण्याची योजना आखली आहे. पँथरला संधी मिळताच तो माकडाच्या कळपावर हल्ला करतो आणि एका माकडाला आपली शिकार बनवतो .यानंतर पँथर माकडाला तोंडात दाबून घेऊन जातो. मात्र पुढच्याच क्षणी माकड आपली बाजी पलवटतो, तेव्हा बाकीची सगळी माकडं मिळून पँथरवर हल्ला करतात. पँथर आपल्या मार्गाने लढण्याचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी त्याला अनेक माकडांसमोर पराभव स्वीकारावा लागतो आणि तो आपली शिकार सोडून तिथून पळून जातो.

Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
car police viral video loksattA
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले
Loksatta editorial External Affairs Minister Jaishankar statement regarding the border dispute between India and China Eastern Ladakh border
अग्रलेख: विस्कळीत वास्तव!
Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात
cat saves from pack of 4 dogs
Video : मांजरीचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीची झुंज; चक्क चार श्वानांना लावलं पळवून!

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरलं भरलं “हिंदमाता” भरलं; पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, रस्त्यांना नदीचे स्वरुप…दादरमधला VIDEO पाहा

लेटेस्ट साइटिंग नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत सुमारे ११ लाख ३० हजार वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला ५ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया यूजर्सही यावर कमेंट करत आहेत. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… माकड एकमेकांचे संरक्षण कसे करतात हे पाहणे खूप आनंददायक आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.. मैत्रीचे कौतुक करावे लागेल! ही निष्ठा आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… पँथरमध्ये किती चपळता आणि धैर्य आहे.