काही लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडतात. काही वेळा प्राण्यांचे चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. तर, काही वेळेला प्राण्यांनी लोकांवरती हल्ले केल्याचे व्हिडीओ असतात. बिबट्या हा सर्वांत खतरनाक प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडी असो वा गडद अंधार; बिबट्या अगदी सराईतपणे शिकार करू शकतो. बिबट्याकडे चित्त्यासारखा वेग, माकडांसारखी चपळता, सिंहासारखे धाडस असते. परंतु, आज आम्ही बिबट्याने शिकार केल्याची नाही, तर बिबट्याची अनोखीच कृती घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत.

तुम्ही आतापर्यंत वन्यजीवांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण, आज आम्ही तुम्हाला जंगलाचा एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत; जो तुम्ही याआधी नक्कीच पाहिला नसेल. हा व्हिडीओ बिबट्याचा आहे; जो जंगलातील सर्वांत क्रूर आणि चपळ प्राणी आहे. पण, इथे मात्र बिबट्याला स्वतःला आरशात पाहिल्यावर धक्का बसला आणि त्याने काचेवरच हल्ला केला. आता या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

Momos recipe in marathi how to make tasty and healthy soya momos recipe without using maida
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हेल्दी सोया मोमोज; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
All about the 150-second walking workout to burn calories Walking workout tips
Walking workout: तुम्हालाही घरात राहून कॅलरीज बर्न करायच्या आहेत का? डॉक्टरांनी सांगितला अवघ्या १२० सेकंदाचा व्यायाम
Childs Hilarious Response to 'Where Were You at Your Parents' Wedding?'
“मम्मी पप्पांच्या लग्नात तु कुठे होता?” चिमुकल्याने दिले भन्नाट उत्तर, Video होतोय व्हायरल
loksatta balmaifal Ganapati festival holiday school
सुखाचे हॅशटॅग : तुच तुझा सुखकर्ता
Dance video done by old man on marathi song Khelatana rang bai holicha currently going viral
“खेळताना रंग बाई होळीचा…” लावणीच्या कार्यक्रमात आजोबांचा जबरदस्त डान्स; एका VIDEO मुळे झाले फेमस
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल

(हे ही वाचा: मुलगा जमिनीवर पडला अन् डोक्यावरून नेली बाईक; थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलात एक मोठा आरसा लावण्यात आला आहे; जो प्राण्यांच्या चाचणीचा भाग आहे. एक बिबट्या आरशाजवळून जात असतो. पुढे जात असताना त्याचे लक्ष आरशाकडे जाते. स्वत:ला आरशात पाहून तो एकदम हैराण होतो आणि मग धडपडू लागतो. बिबट्या त्याचे पुढचे दोन्ही पाय वर करून अचानक हल्ला करण्याच्या स्थितीत येतो. पण, काचेतील त्याचेच प्रतिबिंब त्याला गोंधळात टाकते आणि काही सेकंद तो तसाच उभा राहतो. त्याला असे वाटते की, काचेच्या आत दुसरा प्राणी आहे आणि तो पुन्हा काचेतील आपल्याच आकृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि घाबरतो.

हा व्हिडीओ ‘X’ (पूर्वी Twitter)वर ‘Nature is Amazing’ (@AMAZlNGNATURE) हॅण्डलसह शेअर करण्यात आला आहे. हे पेज वन्यजीवांचे व्हिडीओ शेअर करीत असते. अलीकडेच या पेजवर बिबट्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता; ज्याने स्वतःला पहिल्यांदाच काचेत पाहिले होते. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘स्वतःला आरशात पाहिल्यानंतर बिबट्याची प्रतिक्रिया’.

येथे पाहा व्हिडिओ

बिबट्याच्या या प्रतिक्रिया लोकांना आवडल्या असून, अवघ्या १५ सेकंदाची ही क्लिप आतापर्यंत ८.७० लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. १८ हजार युजर्सनी लाइक केले आहे. लोक कमेंट्समध्ये प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “बिबट्यानं हल्ला करून स्वतःला घाबरवलं. क्यूट.”

दुसरा म्हणाला, “मागच्या पायांवर उभा राहून त्यानं तोल सांभाळला. स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी त्यानं शेपटीचा आधार घेतला.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “प्राण्यांच्या यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या गोष्टींवर विचित्र प्रतिक्रिया असतात.”