Leopard funny video: समाजमाध्यमांवर प्राण्यांचेही विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर; तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या तळ्यामध्ये मासे पकडण्यासाठी गेल्याचे दिसत आहे; पण यावेळी त्याच्याबरोबर असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

अनेक जण आपली दोन वेळची भूक मिटविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. मग तो माणूस असो किंवा प्राणी, काही प्राणी शिकार करताना शांत राहून युक्तीचा वापर करून डाव साधतात. पण कधी कधी भूक भागविण्याच्या नादात काही प्राणी अधीर होतात. या व्हिडीओतील बिबट्याबरोबरही असंच काहीतरी होत आहे.

Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Farmers be careful while working in farms during rainy season a snake was hiding under the gras banana farm see the thrilling shocking video
शेतकऱ्यांनो शेतात फवारणी करायला जात असाल तर सावधान; ‘हा’ VIDEO पाहून फुटेल घाम
MP News, Gwalior News, Gwalior Police, Madhya Pradesh news, Gwalior Viral news
एवढी हिम्मत येतेच कुठून? विद्यार्थ्याची मुख्याध्यापकांना मारहाण; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ जंगलातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बिबट्या शिकार करण्यासाठी तळ्याच्या किनाऱ्यावर उभा राहतो. यावेळी त्याला तळ्यातील माशांना खायचे होते म्हणून तो त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. अचानक त्याला एक मोठा मासा सापडला आहे, असे वाटते. म्हणून तो पटकन त्याला आपल्या जबड्यात पकडून तळ्याच्या बाहेर आणतो; पण त्यावेळी बिबट्याने जबड्यात मासा नाही, तर चक्क स्वतःची शेपूट पकडली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘याला म्हणतात डान्स’… ‘गुटर्रSS गुटर्रS’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @savan_editzz.007 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास १२ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “म्हणूनच शिक्षण खूप महत्त्वाचं आहे.” दुसऱ्याने लिहिलेय, “बिबट्याला असंच पाहिजे.” तिसऱ्याने लिहिलेय, “हाहाहा… मजा आली व्हिडीओ पाहून.” आणखी एकाने लिहिलेय, “बिचारा बिबट्या.”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत वाघाने तळ्यात पाणी पिणाऱ्या हरणाची शिकार केली होती. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये बिबट्याने स्वतःची शिकार घाबरून तरसाला दिली होती.