जंगलात फक्त तेच प्राणी टिकतात, जे बलवान असतात किंवा जे एकत्र राहतात. एकीचं बळ असले तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, ही म्हण खरी असल्याचे सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये माकडांच्या संपूर्ण कळपाने मिळून एका माकडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला धडा शिकवला असून बिबट्याला पळवून पळवून मारलं असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दक्षिण आफ्रिकेतील ग्रामीण भागात ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला एक बिबट्या रस्त्याच्या किनारी चालताना दिसत आहे. बिबट्या यावेळी शिकारीच्या शोधात होता, असे यावरुन लक्षात येते. तेवढ्यातच रस्त्याच्या मधोमध माकडांचा एक मोठा कळप चालताना दिसत आहे. माकडं दिसल्यानंतर बिबट्याला आपल्याला शिकार सापडल्याचा आनंद होतो. यानंतर बिबट्या त्यांच्याकडे धावत सुटतो आणि एका माकडावर जोरदार हल्ला करतो. हा बिबट्या चक्क माकड्यांच्या टोळीत शिरून शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला हे माहिती नव्हतं की, त्याला चांगला धडा शिकविला जाणार आहे आणि लगेचच तब्बल ५० माकडांनी मिळून या बिबट्याचाच गेम केला.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुमारे ५०-६० माकडांचा समूह मिळून बिबट्यावर हल्ला करतो आणि बिबट्यालाच पराभूत करतो. माकडं इतक्या मोठ्या संख्येत असल्याने बिबट्या प्रयत्न करुनही स्वत:ला वाचवू शकत नाही. आपला हल्ला फसलाय हे लक्षात येताच बिबट्या जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण या माकडांनी त्याला पळू सुद्धा दिलं नाही. यानंतरही माकडं त्याचा पाठलाग सोडत नाही. दरम्यान रस्त्यावर हा थरार सुरु असल्याने गाड्या काही वेळासाठी तशाच थांबल्या होत्या, असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.

हा व्हिडीओ खूप जुना असला तरी तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @AMAZlNGNATURE नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे, ज्याला बातमी लिहिपर्यंत १८.३ मिलियन व्ह्यूज आणि एक लाख २७ हजार लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पहिल्यांदा लेटेस्ट साइटिंग्स नावाच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये हा व्हिडीओ क्रुगर नॅशनल पार्कचा असल्याचे सांगण्यात आले आहे. जे ३८ वर्षीय मर्वे मर्सिनलिगिलने तिच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वांनीच या माकडांच्या एकजूटीचं कौतुक केलं आहे. “याला म्हणतात एकीचं बळ”, हे या माकडाच्या कळपांनी सिध्द करुन दाखविलं आहे.