Shocking video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. जंगल सफारीचा अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. झालं असं की एक बिबट्या बसची काच उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ही बस पर्यटकांनी संपूर्ण भरलेली असून पुढे काय झालं तुम्हीच पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. मात्र, आपण एखाद्या धोकादायक प्राण्याशी सामना करणार आहोत याची त्यांना कल्पना नव्हती.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं गुपचप बसजवळ गेला आणि खिडकी उघडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानं खिडकीची काच उघडली आणि आतमध्ये डोकावून लागला. तेवढ्यात बसमध्ये असलेल्या पर्यटकांचं लक्ष गेलं आणि सगळे सावध झाले. पर्यटकांनी पाहिलं म्हणून नाहीतर बिबट्यानं हल्ला केला असता. पण खिडकीवर लोखंडी ग्रिल असल्यामुळे त्याला आत काही शिरता येईना. तेवढ्यात चालकानं बस सुरू केली आणि मात्र तरीही बिबट्या बसला लटकेला पाहायला मिळाला.

ही घटना बंगळुरूमधील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात घडली असून पर्यटकांचं नशीब चांगलं म्हणून ते बचावले. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत. त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी प्राण्यांच्या जवळ जाऊ नये. तुमची एक चूक खूप महागात पडू शकते म्हणून जंगलातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना वनविभागाकडून पर्यटकांना दिल्या जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही” सिंहाची अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल

चित्त्याचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय,“बिबट्या तुम्हाला पाहत होता की तुम्ही बिबट्याला पाहत होता?”. अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “तुम्ही पिंजऱ्यातून बिबट्याला पाहत आहात आणि बिबट्याबाहेर फिरत आहेत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard tries to enter a tourist bus through the window at bannerghatta biological park animal shocking video viral on social media srk