वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात यापैकी काही मजेशीर असतात तर काही थराराक असतात. काही व्हिडीओमध्ये वन्य प्राणी शिकार कसे करतात हे दिसते. अशाच एका मगरीचा हत्तीवर हल्ला करतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

झिम्बाब्वेमधील व्हिक्टोरिया फॉल्स सफारी लॉजमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाणी पिणाऱ्या हत्तीने मगरीवर हल्ला केल्याची घटना कैद झाली आहे. मगरीने हल्ला केल्याने जीवनासाठी लढणारा हत्ती ओरडताना दिसत आहे.. प्राणघातक हल्ल्याचा थरारक व्हिडिओ लेटेस्ट साइटिंग्सच्या YouTube चॅनेलवर शेअर करण्यात आला होता, जो वारंवार आफ्रिकेतील वन्यजीव क्लिप पोस्ट केला जातो.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक

झांबेझी नॅशनल पार्कच्या कडेला दिसणाऱ्या पाण्याच्या तळ्यात हत्तींचा कळपा पाणी पिताना दिसत आहे. दरम्यान मगर हत्तीवर हल्ला करण्यासाठी पाण्यात दबा धरून बसल्याचे दिसते. बेसावध असलेल्या हत्तीवर ती अचानक हल्ला करते आणि त्याची सोंड पकडते. हत्ती वेदनेने ओरडू लागतो. सैरावैरा धावू लागतो. हे पाहून आसपासचे हत्तीही घाबरून पळून जातात. हत्ती पाण्याबाहेर येतो मगरने सोंड घट्ट पकडल्याने तिही पाण्याबरोबर बाहेर फेकली जाते. हत्ती मगरीला जमिनीवर आपटून कशी तरी आपली सोंड मगरीच्या जबाड्यातून सोडवून घेतो आणि तेथून पळ काढतो. मगर आणि हत्ती दरम्यान काही काळ सुरु असलेल्या हा संघर्ष अंगावर काटा आणणारा आहे. थरारक व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा – हत्तीच्या पिल्लाला सुरक्षा देणारं जंगलातील प्राण्यांचे माणूसप्रेम; VIDEO तील हत्ती कुटुंबाचा निरागसपणा तुमचंही मन जिंकेल

अगदी बालपणातही, हत्ती सामान्यत: सरासरी मगरीच्या शिकारापेक्षा जास्त असतात. हा आकार फायदा मगरींसारख्या संभाव्य भक्षकांपासून हत्तींसाठी संरक्षणात्मक यंत्रणा म्हणून काम करतो, मगर प्रामुख्याने लहान प्राण्यांना त्यांच्या जेवणासाठी लक्ष्य करतात.

हेही वाचा – पनीर बिर्याणीत आढळला चिकनचा तुकडा, धार्मिक भावना दुखावल्याची व्यक्तीची तक्रार, झोमॅटो म्हणे, “कोणाच्याही भावना….”

संशोधन असे सूचित करते की, हत्ती उल्लेखनीय बुद्धिमत्ता आणि सामाजिक जटिलता प्रदर्शित करतात, जे शिकारीसह विविध आव्हानांना तोंड देत असतानाही त्यांच्या परिसंस्थेत नेव्हिगेट करण्याची आणि त्यांची भरभराट करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करतात.