अलीकडेच, बचपन का प्यार हे गाणे भारतात व्हायरल झाले होते. एका छोट्या मुलाच्या तोंडातून बाहेर पडलेले हे शब्द सर्वांना खूपच आकर्षक वाटले होते. त्या मुलाचे बचपन का प्यार विसरले जात नाही तोवर आता एका पाकिस्तानी मुलाने इम्रान खानसाठी ‘प्रेम’ हे गाणं गायलेला हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक रिपोर्टर मुलासोबत दिसत आहे. रिपोर्टर आधी मुलाला त्याचे नाव विचारतो आणि नंतर त्याला सांगतो की त्याला इम्रान खानला काय सांगायचे आहे?
रिपोर्टरच्या प्रश्नावर, मुलाने त्याचे नाव दिले आणि सांगितले की त्याला इम्रान खानसाठी नज़म सादर करायचं आहे. मुलग गातो, “नया छिछोरा द सरदार, इसने लूट मचाई है.बनता फिरता है कप्तान ये तो कसाई का भाई है. हाय तब्दीली रास न आई, चारों तरफ सिर्फ महंगाई है.” एवढेच नाही तर मुलाने इम्रान खान यांना गाण्यात चीनमधील चोरीचा भागीदार सांगितले तसेच या मुलाने गाणं गात गात बरेच काही सांगितले आहे.
इथे बघा व्हायरल व्हिडीओ:
नेटीझन्सची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आले आहेत. वापरकर्त्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे आणि ते कमेंट्स करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विनोदी कमेंट्स करत आहेत. काही वापरकर्ते म्हणतात की, “हे अगदी बरोबर आहे की इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासून देशात महागाई शिगेला पोहोचली आहे.” त्याचवेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “लहान मुलाने एका गाण्यात संपूर्ण देशाची परिस्थिती सांगितली आहे.”
तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ?