कॅनडाच्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयामुळे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या हेडलाईन्समध्ये झळकत आहेत. पण सोशल मीडियावर मात्र त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेकदा आपण भाषण करताना ओळीच्या मध्यावर येताच आपली शब्दांची ट्रेन भरकटते, असे प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा येतात. पण नेतेमंडळींच्या भाषणात तेही पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीकडून हे असं काही झालेलं दिसलं तर व्हायरल तर होणारच! असाच काहीसा प्रसंग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याबाबतीत घडला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तसंच नेटकरी मंडळींनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भाषण करताना दिसून येत आहेत. एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांना कॅनडामध्ये त्यांचे अधिकार आणि समर्थन देण्याबाबत ते बोलत आहेत. यावेळी LGBTQ+ हा शब्द उच्चारताना अडखळले. सुरूवातीला ते LGDP, नंतर LGTP आणि मग ते LGT म्हणू लागतात. आपल्याला LGBTQ+ हा शब्द नीट उच्चारता आला नाही म्हणून ते स्वतः बोलताना हसतात आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा ते योग्य उच्चार करत आपल भाषण सुरू ठेवतात.
तीन वेळ शब्द उच्चारताना अडखळले…
जस्टिन ट्रुडो एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांना संबोधताना म्हणाले, “मी कधी LGDP… LGTP … LGT ++ मुलांसाठी उभं राहण्यासाठी मी माफी मागणार नाही.” कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीने गेल्या सोमवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विजय मिळवला आहे. संसदेत बहुमत मात्र त्यांना मिळालेलं नाही. मध्यावधी निवडणुका घेण्याचा ट्रुडो यांचा निर्णय फारसा फायद्याचा ठरलेला नाही. जस्टिन ट्रुडो यांचा लिबरल पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. 2015 साली ते पहिल्यांदा विजयी झाले आणि तेव्हापासून ते सत्तेत आहेत.
पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडिओला आतापर्यंत २.५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ६५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकरी मंडळी देखील या व्हिडीओवर कमेंट्स करत प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
या कारणामुळे लोकांचा राग अनावर
कॅनडामध्ये एलजीबीटीक्यू समुदायातील नागरिकांना त्यांचे अधिकार आणि समर्थन देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. हा देश एलजीबीटीक्यू समुदायातील नागरिकांबाबत उदार मानला जातो. अशा देशाचा प्रधानमंत्रीच जर एलजीबीटीक्यू हा शब्द नीट उच्चारत नाही, तर या समुदायातील नागरिकांना याचं वाईट वाटणं हे सहाजिकच आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याबाबतीत सांगायचं झालं तर नेहमीच ते एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांवर भाष्य करत असतात. पण यंदा ते भाष्य करताना थोडे अडखळले.