Viral Video Shows Life And Competition : आयुष्य सुद्धा एका स्पर्धेप्रमाणेच आहे. कोणताही कठीण प्रसंग समोर आला की, समोरचा किती त्रास देतोय यापेक्षा आणि आपण त्याला कसे सामोरे जातोय हे आवर्जून पहिले जाते. तर स्पर्धेत सुद्धा अगदी जो शेवट्पर्यंत टिकून राहतो त्याचीच प्रशंसा केली जाते. त्यामुळे दुसरा आपल्यापेक्षा चांगला खेळतोय का हे पाहायचे सोडून आपण स्वतः किती त्या स्पर्धेत खरे उतरतोय हे पाहणे तितकेच महत्वाचे असते. आपली स्पर्धा ही इतर कोणाशी नसून फक्त आणि फक्त आपल्याशीच असते. तर सोशल मीडियावर असेच काहीस दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो अनेकांना प्रेरणा देऊन जाईल एवढे नक्की.
जगात असा एकही माणूस नसतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुण नसतो . प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात तर काही ना काही दोष असतात. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार आयुष्याची स्पर्धा जगत असतो. तर आजचा व्हायरल व्हिडीओ समुद्राचा आहे. दोन बोट समुद्रातून जाताना दिसत आहेत. दोन्ही बोटींची स्पीड एकसारखी आहे. पण, यात स्वतःचा जीव सांभाळून, दोन व्यक्ती बोटीत अगदी स्तब्ध उभे राहून समुद्रातून जाताना दिसत आहे. कितीही समस्या आल्या तरी अगदी खंबीर राहून त्याला सामना करायचा असतो हे दाखवणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
अंगावर शहारा कायम
समुद्राला ललकारू नये, पाण्याशी खेळू नये अशी वाक्य आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकली असतील. मच्छीमार समुदायातील लोक याच समुद्राची देवासारखी पूजा करतात आणि आम्हाला सांभाळून घे अशी प्रार्थना करून भल्या मोठ्या समुद्रात नाव घेऊन बोटीसह उतरतात. जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरणे म्हणजे एका धाडसापेक्षा कमी नाही आहे. तसेच काहीसे या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. समुद्रात निघालेल्या एका बोटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच अंगावर शहारा कायम राहतो. कारण भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळासारखी हवा आणि यात बोटीत अगदी स्तब्ध उभे असलेल्या दोन माणसे आणि बोट चालवणारी व्यक्तीचे धाडस बघण्याजोगे आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ ; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे आणि ‘आयुष्य पण फक्त त्याच खेळाडूंनबरोबर खेळते जे एकमेकांशी स्पर्धा करतात’ ; असा मजकूर सुद्धा व्हिडीओवर देण्यात आला आहे. व्हायरल होणारा प्रत्येक व्हिडीओ काही ना काही संदेश आपल्या सगळ्यांनाच देऊन जातो. तर हा व्हिडीओ आयुष्यात कितीही संकटे आली तरी अगदी न डगमगता त्याला सामोरे गेले पाहिजे असे सांगताना दिसतो आहे.