आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते आनंदाने जगता आलं पाहिजे हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण याचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? नसेल तर या पुणेरी आजींचा हा व्हिडिओ नक्की बघा. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुणेरी आजी उत्साहात नाचताना दिसत आहे. आजी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगत आहे.

आयुष्यात आनंद-दुख येत असतात, अनेक संकट येत असतात. एखादा दिवस चांगला जातो तर एखादा दिवस खूप वाईट जातो पण परिस्थिती काहीही असो जो व्यक्ती धैर्याने सर्व गोष्टींचा सामना करतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो. आयुष्यात अनेक छोटे छोटे क्षण असे येतात जे आपल्याला आनंद देतात पण ते क्षण ओळखून त्यांना मनापासून जगण्याचा प्रयत्न मात्र काहीच लोक करतात. अशाच प्रत्येक क्षण आनंदाने जगणाऱ्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा –Ratan Tata Quotes: यशाचे दुसरे नाव आहे रतन टाटा! जाणून घ्या त्यांचे १० प्रेरणादायी विचार

हेही वाचा – टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी रतन टाटांना वाहिली अनोखी श्रद्धांजली! श्वानाची ‘ती’ कृती पाहून उपस्थितही झाले भावूक; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओ गणेशोत्वदरम्यानचाच आहे पण या व्हिडीओमध्ये आजी एका जिन्यावर उभ्या राहून नाचताना दिसत आहे. व्हिडीओसह झिंगाट गाणे ऐकू येत आहे. आजींचा हावभाव आणि उत्साह पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारी आजी बिनधास्तपणे नाचताना दिसत आहे. आजींचा हा उत्साह पाहून अनेकांना आयुष्य आनंदाने जगण्याची प्रेरणा मिळत आहे.

व्हायरल व्हिडिओ mpsc_short_notes नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आबे की,”वयाकडून सुंदर क्षण चोरायला शिका कारण जबाबदाऱ्या कधीच वेळ देत नाही आणि आपण असेच म्हातारे होऊन जातो..”

हेही वाचा –“लोक नोकरी सोडत नाही, ते बॉसला सोडून जातात”, कर्मचाऱ्यांचा राजीनामा पाहून संतापलेल्या बॉसने केली पोस्ट, Toxic Workplaces वरुन पेटला नवा वाद

तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी गणेतोशोत्सवादरम्यान याच आजींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या चक्क ट्रॅक्टरवर उभ्या राहून नाचताना दिसल्या होत्या आणि त्यानंतर “बुगडी माझी सांडली गं” गाण्यावरही त्यांचा नाचताना त्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता. आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आजींच्या व्हिडीओने पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.