Viral Photo: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. ट्रकच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.
रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हालाही जीवनाचं गमक कळेल.
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या ‘अहं’ ला जीवापाड जास्त जपतो. येताना घेऊन आलास काय जाताना घेउन जाणार काय नको अभिमान धरू भल्या माणसा. हे आपण सर्वांनी ऐकलं आहे किंवा ऐकतो आहे, तरी माणसाचा गर्व अहंकार कमी होत नाही. याच पार्श्वभूमीवर या ट्रकच्या मागे एक सुविचार लिहला आहे.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “सोच कर सोचो साथ क्या जायेगा” हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर एक्सवर @PramodIngole99 नावाच्या युजरने शेअर केली आहे. यावेळी पोस्ट शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये “जीवन हे क्षणभंगूर आहे…सोबत काही आणले नाही.. आणि जातांना सोबत ही काहीच येणार नाही..याचा विचार करून जीवनाचा आनंद घ्या..सोचकर सोचो साथ क्या आयेगा.” लिहलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “वय नाही हिम्मत लागते” भर बाजारात कॉलर पकडणाऱ्याला एकटा भिडला चिमुकला, VIDEO पाहून कराल कौतुक
ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या पोस्टला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.