Lift accident video: आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो. हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही. शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे. अशा परिस्थितीत या इमारतींपैकी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करतात.

मात्र या लिफ्ट लोकांसाठी जीवघेण्या ठरत असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. त्‍यामुळे आपण सर्वांनी यापूर्वी मोठमोठे अपघात झालेले पाहिले आहेत. अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तुम्हीही कधीतरी लिफ्टमध्ये गेल्यावर बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीसाठी लिफ्ट थांबवली असेल. मात्र असं करणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलंय. लिफ्टमधून हात बाहेर काढताच लिफ्टचा दरवाजा बंद झाला अन त्याचा हात शरीरापासून वेगळा झाला. हात तुटून खाली जमिनीवर पडला.हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आला.

Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Heroic Railway Employee Saves Young Woman from Suicide: Viral Video
आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावली तरुणी, कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले, धक्कादायक VIDEO VIRAL
Rice weevil Remedies
तांदळाच्या डब्यातील किडे पळवून लावण्यासाठी ‘हे’ सोप्पे उपाय नक्की करा
Stretch marks home remedies and clinical treatments to lighten them effective method
Stretch Marks घालवण्यासाठी करताय प्रयत्न? ‘या’ घरगुती आणि क्लिनिकल पद्धती एकदा वापरून पाहा, लगेच जाणवेल फरक
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
Lottery
Lottery : एनर्जी ड्रिंक खरेदी करण्यासाठी थांबला अन् नशीब पालटलं; लागली ८ कोटींची लॉटरी
Mother and son did theft, Nagpur theft,
नागपूर : पोटासाठी काहीही! मायलेकाने चहाटपरी लावण्यासाठी…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस हाताच्या साहाय्याने लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, असं करणं त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं आहे. लिफ्ट थांबण्याच्या नादात तो त्याचा हात गमावून बसला. त्या व्यक्तीने लिफ्ट थांबवण्याच्या उद्देशाने त्याचा एक हात बाहेर काढला. परंतु लिफ्ट न थांबता त्याचा हातच तुटून बाहेर पडला आहे. त्याचा हात लिफ्टमध्ये अडकून कट झाला.यानंतर लिफ्ट वर गेली, मात्र,त्या व्यक्तीचा हात कापला गेला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “फक्त साथ देणारा कट्टर पाहिजे” म्हशीची शिकार करण्यासाठी सिंहीणीचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

हा व्हिडीओ sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिफ्टचं वेळीच मेंटेनन्स आणि ऑडिट करणं गरजेचं आहे. नाहीतर, दिरंगाईमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. हा व्हिडीओ  (@TriShool_Achuk) या एक्स अकाऊंटवरुन सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे.