Viral video : माणसानं इतके प्रचंड शोध लावलेत की, ते समजल्यावर थक्क व्हावं लागतं. बैलगाडीपासून विमानापर्यंत गतीवर मात करणारी साधनं माणसानं शोधून काढली; पण असं असलं तरी शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो. त्यानं घराघरांतून वीज खेळवली असली तरी आकाशातील वीज त्याच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीज त्याच्या हाती काही नसतं. माणूस दयावंतही असू शकतो; पण निसर्गाला दयामाया माहीत नसते. याचंच एक उदाहरण म्हणजे नुकताच झालेला निसर्गाचा आणखी एक प्रकोप. त्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फोनवर बोलत होता अन् वीज कोसळली (Lightening Strike)
देशभरात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीटदेखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं आहे. तसेच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाऊस पडत असताना झाडाच्या खाली उभं राहून फोनवर बोलत असलेल्या एका युवकाच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये वीज पडल्यानं मोबाईलचा स्फोट झाला अन् तो क्षणात खाली कोसळला. पावसाची स्थिती निर्माण होत असताना आकाशात वीज चमकताना फोनवर बोलणं युवकाच्या जीवावर बेतलं आहे. काही क्षणातच होत्याचं नव्हतं झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
वीज चमकत असताना फोनवर बोलणं टाळणं गरजेचं
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिमझिम पाऊस पडत आहे आणि यावेळी एक तरुण झाडाखाली बाईकवर बसून फोनवर बोलत आहे. अचानक जोरात आवाज येतो अन् वीज कोसळते आणि हा तरुण क्षणार्धात जमिनीवर कोसळतो. हा सर्व प्रकार अचानकपणे कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल एवढं नक्की. पावसाच्या काळात वीज चमकत असताना झाडांच्या आडोशाला थांबल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “आजोबांचा विषय हार्ड” खानदेशी हलगीच्या तालावर आजी -आजोबा जबरदस्त थिरकले; एका VIDEO मुळे झाले फेमस
मोबाईलमुळे खरच वीज पडते का ?
आपण मोबाईलवर बोलत असताना आपला मोबाईल हा मोबाईल टॉवरसोबत कनेक्ट असतो. आपण ज्या वेळेस मोबाईलवर बोलतो, त्या वेळेस आपला आवाज हा ध्वनिलहरींद्वारे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. या ध्वनिलहरी आकाशातून पुढे मार्गक्रमण करीत असतात आणि ज्या वेळेस आपल्या मोबाईलचा डेटा ऑन असतो, त्या वेळेस आपला मोबाईल हा सतत मोबाईल टॉवर आणि इंटरनेटसोबत कनेक्ट असतो. आणि ज्या वेळेस विजा चमकतात किंवा पडतात, त्या वेळेस विजा त्या लहरींमार्गे आपल्यापर्यंत पोहोचू शकतात.
rajput_kawal_jeevansing नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.