Lightning Fell On a Flying Plane: इतका बुद्धिमान आणि संशोधक माणूस! पण शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. इतके प्रचंड शोध लावले माणसांनी की त्यापुढे परमेश्वराने थक्क व्हावे. बैलगाडीपासून विमानापर्यंत गतीवर मात करणारी साधने माणसाने शोधून काढली. पण शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो.वीज त्याने घराघरातून खेळवली असली तरी आकाशातील वीज त्याच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीज गत्यंतर नसते. माणूस दयावंत असतो, पण निसर्गाला दयामाया माहीत नसते. याचंच एक उदाहरण आता समोर येतंय ते म्हणजे, नुकताच निसर्गाचा आणखी एक प्रकोप पाहायला मिळाला. ज्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एअर कॅनडाच्या बोईंग 777 फ्लाइटने व्हँकुव्हरहून उड्डाण केले होते. उड्डाण होताच त्यावर वीज कोसळली आहे. हे भितीदायक दृश्य पाहून लोक घाबरले आहेत.
एअर कॅनडाच्या बोईंग 777 फ्लाइटने व्हँकुव्हरहून उड्डाण केले होते. उड्डाण होताच त्यावर वीज कोसळली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विमान आकाशात उंचावर पोहोचताच अचानक वीज चमकू लागते आणि त्यानंतर विमानावर वीज पडते. विमानाने व्हँकुव्हर विमानतळावरून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उड्डाण केले होते. पण वाटेत हा अपघात झाला. या फ्लाइटमध्ये सुमारे ४०० लोक बसले होते. सुदैवाने, विमानाला काहीही झाले नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kili Paul Video: किली पॉलचं मराठीवरील प्रेम; “काय सांगू राणी मला गाव सुटना” कवितेवरील रील चर्चेत
विजेचा विमानावर अजिबात परिणाम होत नाही. कारण विमानाचा बाहेरचा थर अशा प्रकारे बनवला जातो की त्यावर विजेचा प्रभाव पडत नाही. विमान तयार करताना वैज्ञानिक त्यात कार्बन मिसळतात. याच्या मदतीने विमानाभोवती वीज पडू नये म्हणून संपूर्ण विमान तांब्याच्या पातळ थराने झाकले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा वीज पडते तेव्हा त्याचा आवाज प्रवाशांना नक्कीच ऐकू येतो. पण त्याचा उड्डाणावर परिणाम होत नाही.