Christ The Redeemer Viral Photos : सोशल मीडियावर अनेकदा अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर गोष्टी असोत अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र आता एक व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ ब्राझिलचा आहे. येशू ख्रिस्ताच्या १०० फुटी पुतळ्यावर वीज पडल्यचा हा व्हिडिओ आहे. ब्राझिलमधला हा येशू ख्रिस्ताचा पुतळा जगातला तिसरा सर्वात उंच पुतळा आहे. अशात या पुतळ्यावर वीज पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारची आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये काय?
ब्राझिलच्या रियो डी जनेरियोमध्ये येशू ख्रिस्तांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर वीज पडतानाचा व्हिडिओ आणि त्यासंबंधीचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही वीज येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या डोक्यावर पडली होती. हा व्हिडिओ आणि फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोकांचा काळजाचा ठोका चुकला होता. सोशल मीडियावर या फोटो आणि व्हिडिओचीच चर्चा सुरू होती.
इंटरनेटवर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोक चर्चा करू लागले. कुणी असं म्हटलं आहे की ही ईश्वरीय शक्ती आहे. काही जण हे अद्भूत आहे असंही म्हणत आहेत. ब्राझिलमध्ये या पुतळ्यावर वीज कोसळण्याची घटना वर्षातून पाच ते सहावेळा तरी घडते. यामुळे या पुतळ्याचं बरंच नुकसानही झालं आहे.
२०१४ मध्येही घडली होती अशीच घटना
२०१४ मध्येही येशू ख्रिस्ताच्या या भव्य पुतळ्यावर वीज पडली होती. त्यानंतर या पुतळ्याची दुरूस्ती करावी लागली होती. त्यावेळीही या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता जे फोटो समोर येत आहेत त्यात येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या डोक्यावर वीज पडताना दिसते आहे. १० फेब्रुवारी २०२३ ला संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.