‘देव तारी त्याला कोण मारी’ असं म्हटलं जातं, या वाक्याला साजेस उदाहरण समोर आलं आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती एकदा नव्हे तर दोनदा मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे. तर या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे आणि तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल का होतोय ते पाहूया.
खरं तर, आकाशातून वीज ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर पडते त्याची क्षणात काय अवस्था होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु @thefige_ नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमधील एका व्यक्तीवर वीज पडली तरीदेखील तो सुखरुप असल्याचं पाहायला मिळत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
हेही पाहा- बापरे! स्कूटरवर बसून तरुण आकाशात उडाला; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
या अनोख्या घटनेचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “एकाच ठिकाणी दोनदा वीज पडत नाही, परंतु इथे एकाच व्यक्तीवर दोनदा वीज पडली आहे.” या अनोख्या घटनेचा व्हिडिओ आतापर्यंत १३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना या व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आश्चर्यचकित करणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्यावर वीज पडते. विजेचा कडकडाट होताच तो जमिनीवर पडतो. वीड पडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं सुरुवातीला वाटतं. परंतु काही वेळाने तो उभा राहतो आणि पुढे चालत जातो. याचवेळी पुन्हा एकदा त्याच्या अंगावर वीज पडते आणि तो जमिनीवर कोसळतो. दुसऱ्यांचा अंगावर वीज पडल्यामुळे त्याचा नक्कीच मृत्यू झाला असणार असं व्हिडीओ पाहताना वाटतं, परंतु सुदैवाने तो यावेळीही मृत्यूच्या दाढेतून परत येतो.
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दोनदा वीज पडूनही तो व्यक्ती जिवंत आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ फेक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत. परंतु, व्हिडीओ फेक असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तसेच हा व्हायरल व्हिडिओ २०११ मधील असल्याचा दावाही केला जात आहे.