तुमचे वरिष्ठ जर कार्यालयात महत्त्वाची मिटिंग घेणार असतील तर प्रत्येक कर्मचाऱ्याने त्या मिटिंगमध्ये उपस्थितीत राहिलेच पाहिजे, हा जणू अलिखित नियमच असतो. त्यातून ही मिटिंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने बोलावली असेल तर मग त्याला उपस्थित राहणं खूपच गरजेचं असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video : चाहत्यांना चुकवण्यासाठी विमानात धोनीला करावी लागली कसरत

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात येणार असेल तर गैरहजर राहण्याची चूक कोणीही करणार नाही. कारण एकतर त्यांच्यावर नकारात्मक छाप पडण्याची किंवा नोकरी जाण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. ‘लिंक्ड इन’च्या अॅनलिटिक्स मॅनेजर या पदावर काम करणाऱ्या मरिया सोबतही असाच प्रकार घडला. ‘लिंक्ड इन’चे सीईओ जेफ विनर यांची आपल्या कर्मचाऱ्यांसोबत महत्त्वाची मिटिंग ठेवली होती. पण यावेळी मरिया मात्र सुट्टीवर होती. आपण अनुपस्थित असल्यावर कदाचित जेफ यांना राग येईल म्हणून जाताना तिने आपल्या डेक्सवर त्यांच्यासाठी माफीनामा लिहाला. जेफ जेव्हा कार्यालयात आले तेव्हा त्याने माफीनामा पाहिला पण मरियावर न चिडता त्यांनी तिच्या डेक्सवर जाऊन छानसा फोटो काढला . ‘मिटिंगमध्ये मला तूझी कमतरता खूप जाणवली, पण हरकत नाही तू खूप चांगलं काम करत राहा ‘ असं लिहित त्यांनी तिच्या फोटोसोबत काढलेला सेल्फी तिला पाठवला.

जेफ यांची वर्तणूक सगळ्यांना आवडली. एखाद्या वरिष्ठाने आपल्या सहकाऱ्यांशी कसे वागावे, हे जेफ यांनी दाखवून दिले. त्यामुळे याची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे.

तिच्या एका निर्णयामुळे एकाच वेळी ७० हजार फॉलोअर्सनी केलं अनफॉलो