एखादा सिंह जर अचानक समोर आला, तर प्रत्येकाची तारांबळ उडणार हे सहाजिकच आहे. पण जर तुमच्या समोर सिंहांचा कळपसमोर आला तर तुम्ही काय कराल? तुम्ही एक किंवा दोन किंवा फार तर तीन सिहांना एकत्र पाहिलं असेल. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यात एकट्या जिराफाची शिकार करण्याठी तब्बल सहा सिंह एकत्र आल्याचं दिसून आलं. सिहांच्या या कळपाने अगदी शेवटपर्यंत आपली शिकार जाऊ न देण्यासाठी धडपड केली. एक सिंह जिराफाच्या समोरून हल्ला करतोय तर दुसरा सिंह जिराफाच्या पायावर हल्ला करतोय. सहा सिंह अन् एकटा जिराफ या लढाईत नक्की कोणाचा विजय झाला, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. सामान्यतः एकटा सिंह हा जंगलातल्या सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक प्राण्यांना सहज नियंत्रित करतो. परंतु या व्हिडीओमध्ये असं काहीही घडलं नाही. हा व्हिडीओ ४१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी त्याला लाइक केलं आहे. जंगलात सिंहाच्या कळपाने प्रौढ जिराफाची शिकार करण्यासाठी सापळा रचल्याचे दिसून येतंय. सिंहांचा कळपही यामध्ये यशस्वी झाला. यामध्ये सिंहाने जिराफाला पाठीमागून पकडलं तर काहीजण जिराफाचे मागचे पाय जबड्यात दाबून बसले आहेत. आणखी एक सिंह जिराफच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु इतका सापळा रचूनही सिंहाना मात्र त्यांच्या शिकारीत यश मिळत नाही.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल
हा धक्कादायक व्हिडीओ प्रत्येकजण अगदी मन लावून पाहत आहेत. या व्हिडीओमध्ये जिराफ ज्या पद्धतीने सहा सिंहाच्या कळपाला तोडीस तोड उत्तर देतोय, हे पाहणं फारच रंजक आहे. एकामागोमाग एक सिंह या एकट्या जिराफावर अगदी तुटून पडलेला आहे. मात्र जिराफानेही धीर सोडला नाही आणि चारही बाजूंनी वेढलेला असतानाही तो पहाडासारखा उभा राहिला. उलट अनेक सिंहांना ओढून आपले पाय पुढे खेचले. आपण पाहू शकता की सहा सिंह एकत्र जिराफापुढे मान टेकवू शकले नाहीत आणि सर्वांना माघार घ्यावी लागली. या व्हिडीओमध्ये सुमारे दीड मिनिटांची टाइमफ्रेम पाहण्यासारखी आहे.
आणखी वाचा : फुल विकणाऱ्या एका काश्मिरी व्यक्तीने म्हटला ‘Pushpa’ चा फेमस डायलॉग, लोक म्हणाले, “यात फायर जास्त आहे!”
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. wildlife stories नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘स्ट्रॉंग जिराफ’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोकांना हा व्हिडीओ इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला २० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : गॅसवर चपाती भाजायची शिकत होती ही मुलगी, पण पुढे तिने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘कच्चा बदाम’ या ट्रेंडिंग गाण्यावर तृतीयपंथीने केला जबरदस्त डान्स, लोक बघतच राहिले, पाहा हा VIRAL VIDEO
सिंह सहसा हरण आणि इतर सस्तन प्राण्यांची शिकार करतात, परंतु जिराफांशी सामना ही एक दुर्मिळ घटना आहे. सिंहाला त्याच्या शिकारीवर वर्चस्व मिळवण्यासाठी प्राण्यांच्या मानेला धरावं लागतं, जे जिराफांच्या बाबतीत अत्यंत कठीण होतं. म्हणून कदाचित सहा सिंहांचा कळप असूनही ते जिराफाची शिकार करू शकले नाहीत. युजर्सनी जिराफच्या लढाऊ भावनेचे कौतुक केलं आहे. एकजण म्हणाला, ‘जंगलात सहसा नायक नसतात. शिकारी हल्ला करण्यापूर्वी आजारी, तरुण किंवा वृद्ध आणि शक्तीहीन शिकार शोधतात. यावेळी काहीतरी चुकलं आहे असं दिसतं.”