Lion attacks giraffe: आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. याच नात्यातील सर्वात महत्त्वाचं आणि जवळचं नातं म्हणजे आई-वडील आणि त्यांची मुलं हे आहे. जगातील प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुलं जीव की प्राण असतात, त्यामुळे आपल्या पाल्यासाठी आई-वडील दोघेही खूप संवेदनशील असतात. आपल्या लेकराठीच्या या भावना फक्त मनुष्यांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळतात. ते देखील आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. हिंस्र प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हवे ते प्रयत्न करतात. पण, आता असा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात आपल्या पिल्लाचा जीव जात असतानाही त्याचे आई-वडील शांत उभे राहलेले दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर जंगलातील अनेक प्रकारचे व्हिडीओ आपण पाहतो, ज्यात बऱ्याच गोष्टी कधीही न पाहिलेल्या किंवा आपल्या कल्पनाशक्ती पलीकडच्या असतात. अनेकदा काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्याला धडकी भरवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एका हरिणीने तिच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला होता. पण, आता असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात आपल्या पिल्लाचा जीव जात असतानाही दोन जिराफ निवांत उभे राहिलेले दिसत आहेत.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

जंगलातील एका व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जिराफ नर व मादी त्यांच्या पिल्लाबरोबर जंगलामध्ये फिरत असताना अचानक एक सिंह तिथे येतो आणि त्यांच्या पिल्लावर हल्ला करून त्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो. सिंहासारख्या हिंस्र प्राण्याने आपल्या पिल्लावर केलेला हल्ला पाहून दोन्ही जिराफ एका जागी थांबून सिंहाच्या जबड्यात असलेल्या आपल्या पिल्लाकडे पाहतात. या दोघांपैकी एकानेही पुढे येऊन आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित आपल्या पिल्लासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं त्यांना योग्य वाटलं नसावं.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Adventureinthewildsafaris या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक व्ह्यूज मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जिराफ वडील आणि आई निर्लज्जपणे सिंहाला त्यांच्या मुलाला घेऊन जाताना पाहत आहेत.”

हेही वाचा: ‘आई, तू परत ये ना…’ पाण्यात पोहणाऱ्या मगरीपासून पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी आईने केलं असं काही… VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीही तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. आजपर्यंतच्या अनेक व्हिडीओंमध्ये तुम्ही इतर प्राण्यांना त्यांच्या कळपातील प्राण्यांचा जीव वाचवताना पाहिले असेल. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता प्राणीही माणसांप्रमाणे स्वार्थी झाल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion brutally attacks cub in front of male and female giraffe both of them just kept watching sap