Lion Video: सिंह हा शक्तिशाली प्राणी आहे. म्हणून त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. त्याच्या गर्जनेसमोर मोठे मोठे बलाढ्य प्राणी देखील हार मानतात. सिंह जंगलातील धोकादायक शिकारी मानला जातो. जर त्याच्या तावडीत एखादा प्राणी सापडला तर तो त्याला संपवूनच थांबतो. यावरून तुम्ही सिंहाच्या शक्तीचा अंदाज नक्कीच लावू शकता. मात्र, प्रत्येकामध्ये काही न काही कमतरता असते. जंगलात सिंह कोणावरही हल्ला करू शकतो, पण झाडावर चढून शिकार करायची म्हटलं तर त्याची अवस्था बिकट होते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असंच काहीसं घडलं आहे. हे पाहून तुम्हालाही हसू येईल..
जंगलाचा राजा अक्षरशः रडकुंडीला आला..
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिकाराच्या शोधात असलेला जंगलाचा राजा झाडावर चढतो. तो झाडाच्या टोकावर पोहोचतो. पण त्यानंतर त्याला खाली उतरता येत नाही. तो खाली उतरण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्याकडून ते शक्य होत नाही. तितक्यात त्याचा पाय घसरतो आणि तो दणकण खाली पडतो. सिंहाची अवस्था बघून तुम्हालाही हसू येईल.
येथे पाहा व्हिडिओ
( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)
सिंहांशी संबंधित लाखो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण असे दृश्य तुम्ही पहिल्यांदाच पाहिले असेल. सिंहाचा हा व्हिडिओ waowafrica नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. याला आतापर्यत भरपूर व्ह्यूज मिळाले असून शेकडो लोकांनी लाइकही केले आहे. तसंच जंगलाच्या राजाची झालेली अवस्था बघून लोकं त्यावर कंमेंट देखील करत आहेत.