Viral video: सिंह हा जंगलाचा राजा आहे. तसेच तो एक शक्तिशाली शिकारी आहे. ज्यामुळे इतर प्राणी त्याला घाबरतात. सिंहाची डरकाळी ऐकू आली तर लांब-लांबपर्यंत प्राणी पळ काढतात. एवढंच काय तर अनेकदा वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी देखील त्याच्या वाटेला जात नाहीत. पण असं असलं तरी देखील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. सिंह खतरनाक असला तरी कुटुंबासमोर मात्र त्याचं काही चालत नाही. अन् असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. वाघ, सिंह हे जितके खतरनाक तितकीच त्यांची पिल्लं गोड आणि गोंडस दिसतात. ही एवढीशी पिल्लं आपल्याला काय करणार, असंच आपल्याला वाटतं. पण शेवटी पिल्लू असलं तरी ते खतरनाक प्राण्यांचं आहे हे विसरून चालणार नाही. सिंहाचे छोटेसे बछडेही सिंहासारखेच असतात. या सिंहाच्या पिल्लानं काय केलं तुम्हीच पाहा.
बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मूळापासून नेहमी घट्ट असतं. प्राण्यांच्याही बाबतीत असंच असतं याचंच उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये सिंहाच्या पिल्लानं सिंहाची म्हणजेच त्याच्या वडिलांची झोपलेले असताना छेड काढली. आता पुढे काय झालं तुम्हीच पाहा.
प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेकदा आपण आईविषयी बोलतो, तिच्याविषयी प्रेम व्यक्त करतो पण वडिलांविषयी फार व्यक्त होत नाही. आई इतकेच प्रेम, काळजी जिव्हाळा वडिलांमध्येही दिसून येतो. अनेकदा वडिलांना कठोर वागावे लागते पण याचा अर्थ हा नाही की ते तुमच्यावर प्रेम करत नाही. अगदी असंच प्राण्यांच्याही बाबतीत असतं. आईशी आपण सहज काहीही गप्पा मारतो किंवा कधीकधी तिची खोड काढतो, मात्र हेच वडिलांच्या बाबतीत करताना आपण शंभर वेळा विचार करतो. दरम्यान या सिंहाच्याही पिल्लानं असंच केलं, झोपलेल्या वडिलांची छेड काढली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह शांतपणे दुपारची झोप घेताना दिसतोय. तेवढ्यात या सिहाचं चिमुकलं बाळ पुढे येतं आणि ते वडिलांच्या शेपटीसोबत खेळू लागतं. सिंह आधीच झोपेत आणि हे बाळ शेपटी चावून त्याला त्रास देतेय. परिणामी सिंह भडकला आणि त्यानं रागाच्या भरात मोठी डरकाळी फोडली आणि त्या पिल्लाला पळवून लावलं. मोठा आवाज ऐकून ते पिल्लू घाबरलं आणि लांब आईकडे पळत गेलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
सोशल मीडियावर हा व्हिडीओ Latest Sightings नावाच्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी अनेक मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.