सोशल मीडियावर रोज अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यामध्ये प्राण्यांचे देखील मजेशीर व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंहीण निवांत बसलेली दिसत आहे. त्याचवेळी तिचा अचानक मागून कोणीतरी हल्ला केल्याचे जाणवते आणि ती दचकते. सिंहीणीवर हल्ला करण्याचे धाडस कोण करणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर हे धाडस तिच्याच छाव्याने केले आहे. सिंहीण निवांत बसलेली असताना तिचा छावा हळूच मागून येऊन तिला घाबरवतो. यामुळे सिंहीण घाबरल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आईला त्रास देत घाबरवणाऱ्या या आगाऊ छाव्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून, अनेक जणांनी यावर कमेंट करत प्रत्येक लहान बाळ अशीच गोंडस कृत्य करत असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ ‘योडा४एवर’ (Yoda4ever) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या छाव्याने त्याच्या आईला कसे घाबरवले पाहा.
आणखी वाचा : फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला लॅपटॉप पण आले भलतेच काही; तक्रार नोंदवण्यासाठी शेअर केलेले फोटो झाले व्हायरल
व्हायरल व्हिडीओ :
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
Viral Video : वैतागलेले हत्तीचे पिल्लू रस्त्यामध्येच झोपले; त्यावर हत्तीने काय केले एकदा पाहाच
हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.