सिंह, म्हशी या प्राण्यांचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. सिंहांनी म्हशींची शिकार केल्याचं तुम्ही पाहिलं आहे. पण, सध्या सिंह आणि म्हशींचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. जो बलवान असतो तोच कायम जिंकतो हा निसर्गाचा नियम आहे. परंतु, अनेक वेळा दिसायला बलाढ्य दिसणारे लोकदेखील रणांगणात कमकुवत होतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, होय तुम्ही बरोबर बोलत आहात. कारण या व्हिडीओमध्ये म्हशींनी महाबली सिंहाला सळो की पळो करून सोडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहासमोर भल्या भल्या प्राण्यांची बोलती बंद होताना अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. सिंहाला बघताच जंगलातील काही प्राणी आपला रस्ता बदलतात. तसेच तो जंगलातील सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीदेखील त्याच्यापासून लांबच राहातात. कारण एकदा का त्याच्या हातात कोणी लागलं तर त्याचे प्राण वाचणे अशक्यच. सिंहांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण असं असलं तरी सोशल मीडियावर वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

(हे ही वाचा : VIDEO: रस्त्यावरून धावत होत्या गाड्या अन् १० सेकंदांत कोसळलं भलंमोठं झाड, सावरायलाही मिळाला नाही वेळ; भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद )

हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असल्याचे सांगितले जात आहे. म्हशींच्या कळपाने सिंहासोबत असं काही केलं की त्याला पळताभुई थोडी झाली. इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या सिंहावर आता स्वत:चे प्राण वाचवण्याची वेळ आली होती. या व्हिडीओत जंगलाच्या राजावर म्हशींचा कळप वरचढ ठरला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, म्हशीच्या कळपासमोर जंगलचा राजा सिंह याची हालत खराब झाली आहे आणि तो घाबरून झाडावर जाऊन बसला आहे. या व्हिडीओतून हेही दिसून येतं की, एकतेमध्येच शक्ती असते. खाली मोठ्या प्रमाणात म्हशी दिसत आहेत; तर सिंह घाबरलेला आहे. तो झाडावर चढताना फारच घाबरलेला आहे. हा नजारा बघून लोक अवाक् झाले आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

दक्षिण आफ्रिकेच्या ग्रेटर क्रुगर प्रदेशात वन्यजीव छायाचित्रकारांनी एक नाट्यमय आणि हृदयद्रावक क्षण पाहिला. व्हिडीओमध्ये कैद झालेल्या या दृश्यामध्ये सिंह झाडावर चढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. लेटेस्ट साइटिंग्जने आपल्या यूट्यूब चॅनेलवर हे दृश्य अपलोड केले आहे. मात्र, याच्या पलीकडचे दृश्य फारच भितीदायक आहे. या म्हशींना राग आला आणि त्यांनी झाडाला धक्का देऊन तोडले. यावरून ते किती ताकदवान आहेत याचा अंदाज लावता येतो. झाड तुटताच सिंहाचा पिल्लू खाली पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पण त्याचे नशीब चांगले होते की म्हशींच्या तावडीतून कसे तरी तेथून निसटून आपला जीव वाचवण्यात त्याला यश आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion cubs narrow escape from buffalo in wildlife encounter video viral pdb