जंगलाचा राजा म्हणजेच सिंह हा शक्तिशाली प्राणी आहे. त्याच्या गर्जनेसमोर मोठे मोठे बलाढ्य प्राणी देखील नतमस्तक होतात. सिंह जंगलातील धोकादायक शिकारी मानला जातो. जर एखादा प्राणी त्याच्या तावडीला लागला तर तो त्याला संपवूनच थांबतो. मग समोर माणूस जरी असला तरी त्याला देखील संपवायला तो मागे पुढे बघत नाही. यावरून तुम्ही सिंहाच्या शक्तीचा अंदाज नकीच लावू शकता. मात्र, तुम्हाला माहित आहे का, जंगलाचा राजा देखील घाबरतो आणि तो म्हणजे सिंहणीला. होय, अलीकडेच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये एक सिंहीण वाटेत शांतपणे झोपलेली दिसत आहे. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या सिंहाची नजर तिच्यावर पडते आणि तो तिच्या जवळ जातो. सिंहाने सिंहिणीला स्पर्श करताच ती झपाट्याने उठते आणि सिंहावर अशा प्रकारे गर्जना करते की सिंह घाबरतो आणि मागे जातो. सिंहीणाची भीती सिंहालाही घाबरवते. या जंगली सिंहिणीचा कहर पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

( हे ही वाचा: आधी आपटून आपटून मारले मग गिळले, मगरीने माशाची केली थरकाप उडवणारी शिकार; पहा VIRAL VIDEO)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: तब्बल ७० वर्षांनी भारतात पाहायला मिळणार चित्ता; PM मोदींना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जंगलाची राणी जंगलाच्या मध्यभागी आनंदाने झोपलेली आहे. इतक्यात तिथून जाणारा सिंह तिच्या जवळ जातो आणि तिला स्पर्श करताच ती अशी गर्जना करते की जंगलाच्या राजाची अवस्था बिकट होते. सिंह कसा तरी स्वतःला सिंहिणीच्या हल्ल्यापासून वाचवतो, पण झोपलेल्या सिंहिणीला उठवण्याची चूक केल्यास आपले काय होणार याची किंचितही कल्पना सिंहाला नसावी.

हा व्हिडीओ ट्विटरवर @bkbuc नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. आतापर्यंत १.४१ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion disturb lioness while sleeping suddenly queen got violent gps