Viral video: आईला जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणतात. कारण आपल्या मुलावर कोणतीही अडचण येण्याआधीच आई त्याच्या मागे उभी असते. आईच्या प्रेमाच्या आणि समर्पणाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील.जशी आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात, त्याचप्रमाणे प्राणी देखील आपल्या मुलांवर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत त्यांचे संरक्षण करतात. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालत मुलांचा जीव वाचवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरंतर आम्ही आईच्या शौर्याबद्दल बोलत आहोत कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण या आईच्या ताकदीपुढे सिंहालाही माघार घ्यावी लागली.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सिंहाचं पिल्लू जंगलात खेळत होतं. या पिल्लाचं कुटुंब त्याच्यापासून थोडं दूर होतं. अन् हीच संधी साधून एका तरसांच्या टोळीनं त्याच्यावर हल्ला केला. तरस हा देखील जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो.यावेळी त्यांनी थेट सिंहाच्या पिल्लावर हल्ला चढवला. या पिल्लाला त्यांनी चारी बाजूंनी घेरलं आणि हल्ला करू लागले. अर्थात पिल्लाकडे फारसा अनुभव आणि ताकत नसल्यामुळे ते अपेक्षित प्रतिकार करू शकत नव्हतं. पण तेवढ्यात तिथे एका सिंहीणीची एण्ट्री झाली. अन् तिनं मोठ्या हुशारीनं आधी या पिल्लाला तरसांपासून दूर केलं आणि त्यांना पळवून लावलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मानलं भावा तुला! अपघात टाळण्यासाठी ट्रक ड्रायव्हरचा भन्नाट जुगाड; VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास नाही बसणार
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला सुद्धा लाखो व्ह्यूज आहेत. नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात.