Lion Lioness Fight Video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है ही म्हण तुम्ही ऐकली असेल मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हे पाहायला देखील मिळालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
झुंड में तो सूअर आते हैं, शेर अकेला ही आता है
सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आहेत. शिकारी प्राणी नेहमी त्यांच्या शिकारीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच सावजावर हल्ला करतात… हे प्राणी सावज पकडण्यासाठी धूर्तपणे वेगाचा वापर करतात. विशेषतः सिंह, चित्त्यासारख्या मोठ्या प्राण्यांचा शिकारीचा अंदाज पाहण्याजोगा असतो. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात, ज्यात प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिंहाने अवघ्या १५ सेकंदात ३५ शिकाऱ्यांना सळो की पळो करुन सोडलं. सिंहाच्या येण्याची चाहूल लागताच हे सर्व प्राणी तिथून पळून गेले.
नेमकं घडलं तरी काय ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जवळपास वीस एक तरस आणि तितकीच गिधाडं एका हत्तीला खात होते. तेवढ्यात जंगलाच्या राजाची एन्ट्री होते आणि मग काय शिकार सोडून आपली शिकार होऊ नये म्हणून सगळेच तिथून धूम ठोकतात. वीस एक तरस तरी या मेलेल्या हत्तीला खात आहेत. शिवाय त्यांच्यासोबत गिधाडं सुद्धा हत्तीची शिकार करत आहेत. मात्र वाघानं अशी जबरदस्त एन्ट्री मारली की सगळ्यांचीत हवा टाईट झाली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> PHOTO: “आप्पाचा विषय लय हार्ड ए” आप्पांना मागितला OTP पण…मुंबई पोलिसांची ही पोस्ट वाचून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांना प्राण्यांची लढाई व त्यांची हुशारी पाहणे आवडते हे या व्ह्यूज व कमेंट्समधून दिसून येते. अंगावर काटा आणेल असा हा जंगलातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जंगलात काही वेळा प्राणी माणसांच्या विचारापलीकडे जाईल अशी भांडणे करतात.
© IE Online Media Services (P) Ltd