सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. त्यात सिंहाचे व्हिडीओ पाहताना तर अंगावर काटा येतो. आजपर्यंत तुम्ही सिंहाच्या शिकारीचे आणि गर्जना फोडतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. ज्यांना जंगलाचा राजा असं म्हटलं जातं अशा सिंहाचं नाव जरी घेतलं तरी अंगाचा थरकाप उडतो. तर पाहणं तर लांबच राहिलं. पण सध्या सोशल मीडियावर सिंहाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला कोणतीही भीती वाटणार नाही तर चेहऱ्यावर एक स्माईल येईल. या व्हिडीओमधले सिंह कोणतीही शिकार करत नाही तर रस्त्याच्या मधोमध बसून वाहतूक अडवली आणि एकमेकांसोबत मस्ती करू लागले. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुरूवातीला दोन सिंह चिखलाने भरलेल्या रस्त्याच्या मधोमध आरामात बसलेले दिसत आहेत. रस्त्यावर लोळत ते एकमेकांसोबत मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसून येत आहेत. या रस्त्यावरून जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी भरलेल्या काही जीपही पाहायला मिळतात. थोड्या वेळाने त्यांच्यासोबत आणखी तिसरा सिंह सामील होतो आणि गाड्या अडवून हे तीनही सिंह मस्ती करू लागले. ते या रस्त्यावरून बाजूला होण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीत. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजरने @buitengebieden नावाच्या अकाउंटवरून शेअर केलाय. रस्त्याच्या मधोमध हे तीनही सिंह आराम करताना दिसतात. विशेष म्हणजे रस्त्यावर पर्यटकाच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तरीही हे तीन सिंह काही तिथून उठण्याचं नाव घेत नव्हते. यामुळे इथल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. 

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शाळकरी मुलीने ‘सामी-सामी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, रश्मिकाही झाली फिदा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पक्ष्याने चक्क महिलेचे इअरबड चोरले, पाहा हा मजेदार VIRAL VIDEO

हा व्हिडीओ टांझानिया देशातला असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.