जंगल सफारीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो प्रचंड पाहिला जात आहे. खरं तर हा व्हिडीओ यापूर्वीच इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. मात्र पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. वास्तविक, काही लोक जंगल सफारीला गेले होते. ते कारमध्ये बसून सिंहांचा कळप पाहत होते आणि सोबत त्यांचे व्हिडिओ, फोटो सुद्धा काढत होते. तेवढ्यात एक सिंहीण त्यांच्या गाडीजवळ येते आणि दातांनी दरवाजा उघडते. यानंतर कारमध्ये बसलेली लोक आरडाओरडा करायला सुरुवात करतात. त्यानंतर काय होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कारचा दरवाजा लॉक करण्यास कधीच विसरणार नाही हे नक्कीच..

सिंहिणीने दाताने उघडला दरवाजा…

१.१३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की काही लोक कारमध्ये बसून जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत. यासोबतच ते गाडीच्या खिडकीतून शेजारील सिंहांचे व्हिडिओ आणि फोटो काढत आहेत. दरम्यान, एक सिंह उभा राहतो, आणि गाडीच्या जवळ जाऊ लागतो. हे पाहून कारमधील लोक गाडी थोडी पुढे नेतात. पुढे देखील काही सिंहाचा कळप बसलेला असतो. दरम्यान, एक सिंह गाडीच्या अगदी जवळ येतो आणि काही क्षण आतमध्ये डोकावून पाहिल्यानंतर तो दरवाजाचे हँडल तोंडाने धरून दरवाजा उघडतो. हे पाहून आत बसलेले पर्यटक ओरडू लागतात. घाईघाईत ते कसातरी दरवाजा बंद करतात. हे प्राणी असे देखील काही करू शकतात, हे कोणालाच माहीत नव्हत. हा व्हिडीओ खरंच थक्क करणारा आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पाहा या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ…

( हे ही वाचा: आई-बाबांना सांगू नका…कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ६ वर्षाच्या मुलाने डॉक्टरांकडून मागितले प्रॉमिस, पोस्ट होतेय Viral)

५ जानेवारी रोजी या घटनेची व्हिडिओ @TansuYegen याने पोस्ट केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे” सफारी संपली! हा व्हिडीओला आतापर्यंत १२.८ मिलियन व्ह्यूज मिळाले असून १४ हजारांहून अधिक लाईक्स आणि भरपूर कमेंट्स मिळाल्या आहेत. मात्र, कारचा दरवाजा उघडल्यानंतर काय झाले हे लोकांना जाणून घ्यायचे होते. अशा परिस्थितीत, ट्विटर वापरकर्त्याने जेव्हा @TariqMo77 या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला, तेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले! ही क्लिप पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Story img Loader