अंकिता देशकर

Lion Roaming On Street: एका किशोरवयीन मुलाच्या हत्येनंतर सलग तीन दिवस फ्रान्सची राजधानी पॅरीस मध्ये हिंसाचार सुरू होता. अजूनही या आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही. देशाच्या विविध भागांमधून जाळपोळ आणि दगडफेकीच्या बातम्या समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया सुद्धा व्हिडीओज व फोटोंनी ओसंडून वाहत आहे. यातील एक नवा व्हिडीओ अनेकांच्या भुवया उंचावत आहे. यात फ्रान्सच्या रस्त्यावर चक्क एक सिंह मुक्तपणे संचार करताना दिसत असल्याची चर्चा आहे. लाईटहाऊस जर्नालिज्मने याबाबत सविस्तर तपास करून आता सत्य समोर आणले आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Sir Mayor ने आपल्या प्रोफाइल वर व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हायरल व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. InVid टूलमधून व्हिडिओचे कीफ्रेम मिळाले जे आम्ही गूगल वर फोटोसहित शोधले. आम्हाला २०२१ मध्ये ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलेली एक कीफ्रेम सापडली.

कीफ्रेम जिथून शेअर केली होती ती व्हिडिओ लिंकही त्यात आढळून आली. त्याद्वारे आम्हाला लक्षात आले की हा व्हिडिओ प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्सने १४ एप्रिल २०२१ रोजी शेअर केला होता.

कीवर्ड वापरून आम्ही त्याबद्दलच्या बातम्यांचे अहवाल शोधले.

https://www.manchestereveningnews.co.uk/whats-on/family-kids-news/knowsley-safari-gets-unlikely-boost-20399790

आम्हाला आढळले की व्हिडिओ नोस्ले सफारीचा आहे. रिपोर्ट मध्ये म्हटले आहे: नोस्ले सफारीच्या प्रवक्त्याने सांगितले, “ब्रिटनीने ‘सफारीचे सिंह’ जगासमोर आणले याचा आम्हाला आनंद आहे. ती स्वतः या मोठ्या मांजरीची फॅन आहे. “

आम्हाला या बद्दल अजून काही बातम्या सापडल्या.

https://www.liverpoolecho.co.uk/whats-on/whats-on-news/britney-spears-jokes-knowsley-safaris-20384572

आम्हाला YouTube वर अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.

आम्ही नोस्ले सफारी पार्कबद्दल अधिक शोधले. मर्सीसाइड मधील प्रेसकोट जवळील नॉस्ले सफारी पार्क ५५० एकरांवर पसरलेली यूकेची सर्वात लांब सफारी ड्राइव्ह आहे. येथे तुम्हाला आफ्रिकन सिंह, पांढरे गेंडे आणि बायसन यांना जवळून पाहता येते.

https://www.reallywildlife.com/best-safari-parks-uk/#:~:text=Knowsley%20Safari%20Park%20near%20Prescot,comfort%20of%20your%20own%20car.

निष्कर्ष: रस्त्यावर फिरणाऱ्या सिंहांचा व्हायरल व्हिडिओ फ्रान्सच्या दंगलीशी संबंधित नाही. व्हिडिओ जुना आहे आणि यूकेमधील नोस्ले सफारी पार्कचा आहे.

Story img Loader