Lion Came In Front Of A Man In The Forest Video Viral : महिंद्रा समुहाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारताचे दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर नवनवीन व्हिडीओ शेअर करून सर्वांना थक्क करत असतात. आताही त्यांनी सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ शेअर करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महिंद्रांनी शेअर केलेल्या या नवीन व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. जंगलात सफारीचा आनंद लुटताना एका व्यक्तीच्या समोर अचानक जंगलाचा राजा सिंह येतो अन् पुढं जे घडतं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जंगल सफारीदरम्यान गाडीच्या बोनेटजवळ असलेल्या सीटवर बसलेला दिसत आहे. याचदरम्यान तो व्यक्ती जंगलातील सौंदर्य पाहण्यात व्यग्र असतो. त्याचवेळी अचानक एक खुंखार सिंह त्याच्यासमोर येतो. या सिंहाला पाहून त्या व्यक्तीच्या नाकीनऊ येतात आणि भीतीने तो सीटच्या मागचं हॅंडल पकडतो. या व्हिडीओत हेच थरारक दृष्य कैद झालं आहे. या व्हिडीओला शेअर करत आनंद महिंद्रा यांनी दोन प्रश्न विचारले आहेत.

इथे पाहा व्हिडीओ

आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केलं आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, जर ही व्यक्ती तुम्ही असता तर तुमच्या डोक्यात काय विचार आले असते? या परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? असे प्रश्न त्यांनी नेटकऱ्यांना विचारले आहेत. या पोस्टला आतापर्यंत १.३ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर ८ हजारांहून जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओला प्रतिक्रिया देत म्हटलंय, ‘मी तर मम्मी असं ओरडलो असतो’. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मी देवाची आठवण काढली असती.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion roaring in front of tourist while doing jungle safari in the forest anand mahindra shares shocking video of lion on twitter netizens lots of reactions on viral video nss