Lion Vs Children Viral Video : सिंहासारखा हिंस्र प्राणी रानावनात भटकून छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची संधी शोधत असतो. एखादा माणूस जर त्याच्या परिसरात फिरत असले, तर सिंह त्याचा फडशा पाडल्याशिवाय राहत नाही. पण पिंजऱ्यात असलेल्या एका सिंहाने दोन मुलांवर ज्याप्रकारे प्रकारे झेप घेतली ते पाहून अनेकांचा थरकाप उडाल्याशिवाय राहिला नसेल. सिंहाचं असा रुप पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. पण व्हिडीओच्या शेवट पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण जंगलात भटकणारा हा सिंह इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, असं तुम्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल. कारण सिंहाच्या तावडीत सापडलेल्या माणसाचा जीव वाचला, अशी घटना क्वचितच घडली असावी. हा व्हिडीओही तुम्हाला थक्क केल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघांवर सिंहाने मोठी झेप घेतल्यानंतर जे घडलं, ते पाहून विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

एरव्ही जंगलात भटकणारा सिंह शिकार केल्याशिवाय राहत नाही. पण या सिंहाने तमाम नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. यामागचं कारणंही भन्नाट आहे. खरंतर सिंहाने रस्त्यावरून जाणाऱ्या माणसावर अचानक झेप घेतली, पण त्याच्यावर हल्ला केला नाही. कारण तो माणूस त्याच्या अत्यंत जीवलग मित्र होता. आपल्या हृदयस्पर्शी मित्राला पाहिल्यानंतर सिंहाच्या प्रेमभावना उफाळून निघाल्या आणि त्याने त्याच्या मित्राला भर रस्त्यातच मिठी मारली. हा सिंह एव्हढा जीवलग असू शकतो, यावर कुणाचाही विश्वास बसणे कठीणच. पण हे सत्य आहे. कारण सिंहाने अत्यंत प्रेमळ भावनेने त्याच्या मित्राला मिठी मारली असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सिंह आणि त्या माणसामध्ये असलेलं जीव्हाळ्याचं प्रेम पाहून नेटकऱ्यांनाही सुखद धक्का बसला आहे. @loionslovershub या इन्स्टाग्राम पेजवर हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नक्की वाचा – तरुणीला वाटलं ‘हाथी मेरे साथी’, पण काही सेकंदातच हत्तीने दिला धोका, Video पाहून धक्काच बसेल

इथे पाहा व्हिडीओ

एरव्ही जंगलात भटकणारा सिंह शिकार केल्याशिवाय राहत नाही. पण या सिंहाने तमाम नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. यामागचं कारणंही भन्नाट आहे. खरंतर या सिंहाने पिंजऱ्याच प्रवेश करणाऱ्या तरुणांवर अचानक झेप घेतली, पण त्यांच्यावर हल्ला केला नाही. कारण ही मुलं त्या सिंहाची अत्यंत जीवलग मित्र असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आपल्या हृदयस्पर्शी मित्र मैत्रिणींना पाहिल्यानंतर सिंहाच्या प्रेमभावना उफाळून निघाल्या आणि त्याने त्याच्या मित्रांवर पिंजऱ्यातच मिठी मारली. हा सिंह एव्हढा जीवलग असू शकतो, यावर कुणाचाही विश्वास बसणे कठीणच. पण हे सत्य आहे. कारण सिंहाने अत्यंत प्रेमळ भावनेने त्याच्या मित्रांना मिठी मारली, असंच या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सिंहाच्या पिंजऱ्यात तीघांसोबत एका कुत्र्यानेही प्रवेश केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. या तिघांमध्ये असलेलं जीव्हाळ्याचं प्रेम पाहून नेटकऱ्यांनाही सुखद धक्का बसला आहे. @ilovesz_lionzz या इन्स्टाग्राम पेजवर हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion takes big jumps towards children as boys entered inside the cage lion vs people video goes on instagram nss