Lion VS Dog Fight Video : सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. त्याच्या हिंसक स्वभावामुळे भले भले प्राणीदेखील त्याला घाबरतात. पण एखादा प्राणी ताकदीने अन् हिमतीसह सिंहाबरोबर भिडला, तर हा प्राणीही लवकर हार मानतो. या हिंसक प्राण्यासमोर दुसरा कोणताही प्राणी आला, तर तो त्याची शिकार केल्याशिवाय शांत राहत नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत या प्राण्याचे अतिशय वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळाले; जे पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंसक स्वभाव आणि शिकारीचे त्याचे कसब पाहून भले भले प्राणी सिंहाला बघून पळून जातात; पण या व्हिडीओत चक्क सिंहांवर पळून जाण्याची वेळ आल्याचे दिसतेय. त्यात सिंहांबरोबर जे काही घडलं, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओनुसार एका कुत्र्याने दोन सिंहांवर हल्ला केला आणि डोळे मिचकवायला सुरुवात केली. इथपर्यंत ठीक होते; पण या कुत्र्याच्या भुंकण्याने सिंह इतके घाबरले की, ते त्याला बघून चक्क मागे हटू लागले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सिंहांना पाहताच कुत्र्याने केला हल्ला

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शेतात दोन सिंह विश्रांती घेत असतात. त्यावेळी एक कुत्रा त्यांच्याजवळ जातोय. सुरुवातीला कुत्र्याला पाहिल्यानंतर सिंह उठून त्याच्या दिशेने जातात; पण कुत्रा सिंहांना पाहून घाबरण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करतो. कुत्रा हल्ला करीत असल्याचे पाहून सिंह दोन पावले मागे सरतात. मात्र, त्यानंतरही हा कुत्रा वारंवार भुंकून सिंहांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावतो.

Read More Trending News : भरधाव ट्रक आला अन् कारबाहेर उभ्या कुटुंबाला…; अपघाताचा काळजात धडकी भरवणारा Live Video पाहाच

सिंह केविलवाणा होऊन हटतो मागे

त्यानंतर सिंह एकाच जागी उभे राहतात. कुत्रा थोडा वेळ भुंकतो आणि मग परत जाऊ लागतो. पण, सिंहांचे मन अजून भरलेले नसते. ते त्या कुत्र्याच्या मागे लागतात. त्यावर कुत्रा पुन्हा वळतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो व भुंकायला लागतो. धक्कादायक बाब म्हणजे कुत्रा जेव्हा दोन सिंहांपैकी एकावर हल्ला करतो आणि त्यांना चावण्यासाठी धावतो. पण, तो सिंह केविलवाणा होऊन मागे हटतो आणि कुत्र्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओच्या शेवटी कुत्रा तिथून निघून जातो. त्या सिंहांकडे कुत्र्याकडे हताशपणे शांतपणे उभे राहून पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे जाणवते.

व्हिडीओवरील कमेंट्स पाहून तुम्ही हसून हसून व्हाल लोटपोट

@the.laugh.villa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे; जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले आहे की, जंगलाचा नवीन राजा अपडेट झाला आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, आमच्या गल्लीत कुत्रासुद्धा सिंह आहे. मी हे फक्त ऐकले होते; पण आज पाहिलेदेखील. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, दोन्ही सिंहांचे पोट भरलेले दिसतेय. चौथ्याने लिहिले आहे की, संदीप माहेश्वरीचा हा प्रेरक व्हिडीओ पाहून तो आला आहे, असे दिसतेय. आणखी एका युजरने लिहिले आहे की, सिंह कुत्र्यांच्या नादाला लागत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion vs dog fight video lions fight dog video a single e dog attacked on 2 lions badly video goes viral on social media sjr