Lioness Attacks Zebra: आई ही शेवटी आईच असते! संपूर्ण जगात आईपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही, असं म्हटलं जातं. निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती कोणी असेल तर ती आई असते. सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओंमधून आईचं आपल्या बाळावरचं प्रेम दिसून येतं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, यामध्ये आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे.
सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येतात. त्यात जंगलातीलही अनेक व्हिडीओ असतात; जे अनेकांना चकित करून सोडतात. जंगलात सिंह किंवा सिंहिणीला पाहून भल्याभल्यांची अवस्था बिकट होते. सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याला जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखलं जातं. जेव्हा हा प्राणी शिकार करायला निघतो तेव्हा इतर सर्व प्राणी घाबरून पळून जातात. पण, सिंहाबाबतची एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल. ती म्हणजेच, सिंह स्वतः शिकार करताना फार क्वचितच पाहायला मिळतात. एकतर सिंहिणी शिकार करतात किंवा इतर प्राण्यांनी केलेली शिकार सिंह हिसकावून घेतात. मात्र, जेव्हा ते शिकारीसाठी भिडतात तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते.
(हे ही वाचा : एक चूक अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; एका व्यक्तीबरोबर लिफ्टमध्ये भयंकर घडलं, व्हायरल Video पाहून बसेल धक्का )
मादी झेब्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका सिंहिणीने शिकार करण्याच्या उद्देशाने एका झेब्य्राच्या पिल्लावर हल्ला केला. सिंहिण झेब्य्राची मान आपल्या तीक्ष्ण दातांमध्ये पकडून त्याला फरफटत नेताना दिसत आहे. एका झटक्यात या सिंहीणीनं त्या पिल्लाचा गळा पकडला आणि त्याला फरफटत घेऊन जाऊ लागली. मात्र, तेवढ्यातच पिल्लाची आई आली अन् तिने सिंहिणीवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या पिलाला वाचवण्यासाठी तिने सिंहिणीशी झुंज दिली.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी शिकार करणाऱ्या सिंहीणीला झेब्य्रानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. तिनं सिंहीणीच्या जबड्यातून आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता संघर्ष सुरूच ठेवला. पिल्लाला सिंहीणीच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न केले. अन् सिंहीणीच्या जबड्यावर लाथ मारुन आपल्या पिल्लाला घेऊन पळ काढला. अखेर आईला यश मिळाले. सिंहीणीने माघार घेतली. आपली शिकार घेऊन जाणाऱ्या झेब्य्राकडे पाहत राहण्याशिवाय सिंहिणीकडे कुठलाच पर्याय उरला नाही. सिंहिणीला झुंज देत अखेर त्या आईने आपल्या मुलाला वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ ‘X’ (पूर्वी ट्विटर) वर ‘@TheeDarkCircle’ हँडलसह शेअर करण्यात आला आहे. हा १६ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका युजरने लिहिले की, “केवळ आईच आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू शकते.” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.