Messi vs Mbappe memes viral news : फिफा विश्वचषक २०२२ च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून ३६ वर्षानंतर जेतेपद पटकावलं. या महामुकाबल्यात अर्जेंटिनाने विश्वचषकावर प्रदीर्घ काळानंतर नाव कोरल्यानं सर्वत्र जल्लोष केला जात आहे. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडून लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे स्टेडियममध्ये असलेल्या हजारो प्रेक्षकांची जेतेपदाचा गोल बघण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मेस्सी विरुद्ध एमबाप्पे यांच्यातच रंगतदार सामना होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र सामना बरोबरीत झाल्यामुळं पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेर अर्जेंटिनानेच बाजी मारली. सुरुवातीला सामना अर्जेंटिनाच्या बाजूने एकतर्फी जात होता, मात्र, एमबाप्पेने गोल करण्याची हॅट्रिक करुन अर्जेंटिनाच्या नाकी नऊ आणले होते. मात्र, मेस्सीनेही जीवाची बाजी लावत पेनेल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाला विजयाच्या दिशेनं नेलं. २०१४ला विश्वचषकात जेतेपद पटकावण्याचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचं अखेरच्या विश्वचषक स्पर्धेत विजयाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कंबर कसली. फ्रान्सकडूनही अर्जेंटिनाला जशाच तसं उत्तर देण्यात आलं. किलियन एमबाप्पे एकटा भिडला आणि अर्जेंटिनाच्या नाकी नऊ आणले. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली.

नक्की वाचा – Video : आरारारारा खतरनाक! मेस्सीच्या चाहत्यांनी केरळच्या अरबी समुद्रात मारली डुबकी, १०० फूट खोल पाण्यात कटआऊट लावला

जगभरात फिफा विश्वचषकाची चर्चा रंगली असतानाच सोशल मीडियावरही लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत. एमबाप्पेने एक गोल जास्त करून गोल्डन बुटच्या शर्यतीत मेस्सीचा पराभव केला. परंतु, मेस्सीलाही फिफा विश्वचषकात अप्रतमि कामगिरी केल्यामुळं गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आलं. या दोघा स्टार खेळाडूंनी मैदानात दाखवलेली जादू इंटरनेटवर अनेकांना थक्क करुन गेली. विशेष म्हणजे, दोघेही पीएसजी फुटबॉल क्लबसाठी खेळतात. दरम्यान, अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये झालेला फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना इंटरनेटवर धुमाकूळ घालून गेला आहे. मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यावर ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल केले जात आहेत.

इथे पाहा ट्विटरवर व्हायरल झालेले मिम्स

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messi and kylian mbappe memes viral on twitter argentina lifts the fifa world cup 2022 nail biting final nss
Show comments