फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात आज रात्री ८.३० वाजता फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना दोहा येथील लुसेल स्टेडियमवर होणार आहे. हा महामुकाबला पाहण्याची तमाम फुटबॉल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अर्जेंटिनाचा हुकली एक्का लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा बादशाह एमबाप्पे यांच्यात कॉंटे की टक्कर होणार असल्याने ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर मेस्सीच्या चाहत्यांच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. भारतातही मेस्सीवर प्रेम करणारा मोठा चाहतावर्ग आहे. केरळमध्ये तर मेस्सीच्या चाहत्यांनी नादच केला. अरबी समुद्रात १०० फूट खोल पाण्यात जाऊन मेस्सीचा चक्क कटआऊट लावण्याचा पराक्रमच त्याच्या चाहत्यांनी केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही येत आहेत.
Video : आरारारारा खतरनाक! मेस्सीच्या चाहत्यांनी केरळच्या अरबी समुद्रात मारली डुबकी, १०० फूट खोल पाण्यात कटआऊट लावला
अरबी समुद्रात १०० फूट खोल पाण्यात जाऊन मेस्सीचा चक्क कटआऊट लावण्याचा पराक्रमच केला.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-12-2022 at 16:08 IST
TOPICSफिफाFIFAलिओनेल मेस्सीLionel Messiव्हायरल व्हिडीओViral Video२०२२ फिफा विश्वचषक2022 Fifa World Cup
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lionel messis fans from lakshadweep install his cutout 100 feet deep in kerala arabian sea fifa world cup 2022 final match nss