Lioness Birthday Viral Video: आपल्याकडे कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी घरामध्ये पाळले जातात. या प्राण्यांचे मालक आपल्या लाडक्या Pet साठी बरंच काही करत असतात. काहीजण तर माणसांप्रमाणे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याचा वाढदिवस देखील साजरा करत असतात. पण तुम्ही कधी सिंहीणीचा बर्थडे सेलिब्रेट होताना पाहिला आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक एका सिंहीणीचा वाढदिवस साजरा करत आहेत असे दिसते. गर्दीतील एका व्यक्तीच्या हातात केक असल्याचे पाहायला मिळते.
ट्विटरवरील या व्हिडीओमध्ये एक सिंहीण जमिनीवर बसली आहे असे दिसते. या सिंहीणीच्या आजूबाजूला लोकांना गर्दी केली आहे. आसपास लोक असतानाही त्यांच्यावर हल्ला न करणारी ही सिंहीण पाळलेली असावी असा अंदाज लावला जात आहे. या गर्दीचा भाग असलेला एक माणूस हातामध्ये केक घेऊन त्या सिंहीणीच्या शेजारी गुडघ्यांवर बसल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता. आपल्याकडे ज्याचा वाढदिवस असतो, त्याच्या चेहऱ्याला केक लावला जातो. काहीजण बर्थडे बॉय किंवा गर्लचा चेहरा अक्षरश: केकने रंगवतात. या पद्धतीने व्हिडीओमधील माणूस त्या सिंहीणीचे तोंड रंगवण्यासाठी हातातील केक तिच्या तोंडावर जोरात मारतो असे दिसते.
तोंडावर केक लावल्यामुळे सिंहीण घाबरते. त्याशिवाय तिच्यामागे बसलेले लोक सुद्धा बिथरतात. काय घडलं आहे हे काही सेकंदांसाठी कोणालाच कळत नाही. पुढे ती सिंहीण आपल्या चेहऱ्यावर लागलेला केक पुसून काढण्याचा प्रयत्न करताना कोपऱ्यात जाते. एखाद्या मांजरीप्रमाणे ती खोलीत फिरते. गर्दीतले काहीजण तिच्या जवळ जाण्याचे धाडस करत नाही, तर काही मुद्दामून तिच्या शेजारी जातात. सिंहीणीच्या तोंडावर केक लावणारी व्यक्ती व्हिडीओमध्ये हसत असल्याचे दिसते.
@?????? या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ लाइक, शेअर केला आहे. व्हिडीओ कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही ट्विटर यूजर्सनी सिंहीणीला त्रास दिल्याबद्दल व्हिडीओमध्ये लोकांवर टिका केली आहे. तर काहींनी सिंहीणीने माणसांपेक्षा जास्त संयम दाखवला आहे म्हटले आहे.