सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. कधी बाईकवर स्टंटबाजी, कधी भररस्त्यात भन्नाट डान्स तर कधी सापांसोबत खिलवाड करतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होताना आपण पाहिले असतील. मात्र, व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांच्या अंगावर काटा उभा केला आहे. हा व्हिडीओ एखाद्या सापाचा नाही, छोट्या मोठ्या पाळीव प्राण्याचा नाही, तर हा व्हिडीओ आहे खतरनाक सिहिंणींचा. शेतकरी एका शेतात काम करत असताना अचानक सिंहिणींचा कळप येतो आणि पुढं जे घडतं ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
शेतात घुसला सिंहिंणींचा कळप अन्…
सिंहिंणींचा कळप सामान्यत: जंगल परिसरात वावरताना दिसतात. मात्र, गुजरातच्या एका शेतमळ्यात सिंहिंणींचा कळप घुसल्यानं एकच खळबळ उडाली. सिंहिणीला पाहून अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. पण शेतात असलेला शेतकऱ्याने सिंहिणीला घाबरून पळ काढला नाही, तर शेतकऱ्याने त्याच जागेवर उभं राहून चक्क मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले. ही सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
वाघ, सिंह यांसारखे वन्य प्राणी विशेषत: रानावनात वावरत असतात. मात्र, त्यांना भूख लागलेली असेल आणि शिकार करायची असल्यास ते मानवी वस्तीतही भटकत असतात. अशा परिस्थितीत त्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण होतं. एक मोठी सिंहिण शेतात मस्त आरामत भटकत असताना तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. त्याचदरम्यान शेतात उभा असलेला शेतकरी जराही न घाबरता त्या सिंहिणींचे फोटो काढतो. हा थरारक व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ गुजरातचा असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी पाहिलं आहे. तर चार हजारांहून अधिक युजर्सनी लाईकही केलं आहे.