सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बहुतांश व्हिडीओमध्ये हे जंगली प्राणी शिकार करताना दिसतात पण आज असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये जंगली प्राण्यांचा संघर्ष दिसत आहे. सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. सिंहाची डरकाळी ऐकली तरी वन्यप्राणी धावत सुटतात. पण सिंह जगालाचा राजा असला तरी शिकार केल्याशिवाय सिंहाला देखील अन्न मिळत नाही. माणूस असो किंवा प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सिंहाचा संघर्ष फक्त अन्नासाठी नसतो तर जगण्यासाठी देखील असतो. जंगलात राहणाऱ्या सिंहासमोरही अनेकदा निसर्ग अडथळे निर्माण करतो मग तो जंगलात पेटणारा वनवा असो किंवा खळखळ वाहणारी नदी. सिंहाला देखील निसर्गाने निर्माण केलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सध्या एका सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खळखळ वाहणारी नदी ओलंडताणाऱ्या सिंहाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

पर्वतांवरून धो-धो कोसळणारी, खडकांमधून वाट काढत खळखळ वाहणारी नदी तुम्ही अनेकदा पाहिली असेल. नदीचं हे रुप पाहायला जितकं सुंदर तितकचं रौद्र आहे. नदीच्या प्रवाहासमोर कोणीही टिकू शकत नाही. अनेकदा पट्टीचे पोहणारे देखील नदीच्या प्रवाहामध्ये बुडून जातात. पण सिंहाने मात्र जीवाची बाजी लावून ही नदी पार केली आहे.

helmets Taloja, bike riders helmets Taloja,
पनवले : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून हेल्मेटचे वाटप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
nisarg lipi aquatic plants
निसर्गलिपी: पाणवनस्पतींची दुनिया
on Kaas Plateau rush of tourists
कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी, वाहतूक कोंडी आणि यंत्रणेवर ताण
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना
Toddlers Marathmola Swag
चिमुकल्याचा मराठमोळा स्वॅग! डोळ्यांवर गॉगल अन् कंबरेला ढोल बांधून वादन करतोय छोटा वादक, पाहा Viral Video
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…

हेही वाचा : YouTuber संजू टेकीने कारमध्ये बनवला स्विमिंग पूल अन् भररस्त्यात झाल असं काही, Viral Video बघाच

युट्युबवर लेटेस्ट साईटिंग्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, दोन सिंहांनी वाहत्या नदीच्या प्रवाहाचा कसा सामना केला. नदीच्या किनारी तीन सिंह दिसतात. प्रथम एक सिंह नदीच्या प्रवाहाचा अंदाज घेत पाण्यात शिरतो त्यानंतर दुसरा सिंह देखील पाण्यात उतरतो. त्यांचा तिसरा साथीदार नदीकाठी मागे राहतो. त्यानंतर नदीच्या प्रवाहासह दोन्ही सिंह पुढे जाऊ लागतात. वाहत वाहत एक सिंह नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याच्या दिशेला पोहचतो. लगेच खडकाचा आधार घेऊन तो नदीच्या किनाऱ्यावर येतो. दुसरा सिंह पुढे वाहत जातो पण तोही किनाऱ्याजवळ पोहचतो आणि नदीच्या किनाऱ्यावर येतो. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. तिसरा सिंह मात्र पलीकडे जाऊ शकला नाही.

हेही वाचा – ”आधी मेट्रो, मग रेल्वे अन् आता विमानतळावर विचित्र डान्स करतेय तरुणी, Viral Video पाहून संतापले नेटकरी

हा व्हिडीओ रिचर्ड मुतुटुआ यांनी केनियाच्या मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमध्ये शुट केला आहे.

लहान क्लिपमध्ये दिसल्याप्रमाणे तीन सिंह ओलांडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मुसळधार नदीच्या खवळलेल्या पाण्याकडे टक लावून पाहत होते. सिंह योग्य क्षणाची वाट पाहत असल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. थोड्या वेळाने, सिंहांनी पुरेसे धैर्य एकवटले आणि पाण्यात डुबकी मारली. , नदीच्या प्रवाहात वाहत जाणारे सिंह संपूर्ण शक्ती पणाला लावून किनाऱ्यावर पोहचण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी धीर सोडला नाही त्यामुळे ते किनाऱ्यावर पोहोचण्यात यशस्वी झाले. तिसरा सिंह मात्र घाबरलाहोता कारण त्याने नदीच्या प्रवाहात उडी मारली नाही. हा व्हिडीओ धैर्य, साहस आणि भिती या तिन्ही भावनांचे प्रदर्शन करतो आहे.