सोशल मीडियावर वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बहुतांश व्हिडीओमध्ये हे जंगली प्राणी शिकार करताना दिसतात पण आज असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये जंगली प्राण्यांचा संघर्ष दिसत आहे. सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. सिंहाची डरकाळी ऐकली तरी वन्यप्राणी धावत सुटतात. पण सिंह जगालाचा राजा असला तरी शिकार केल्याशिवाय सिंहाला देखील अन्न मिळत नाही. माणूस असो किंवा प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सिंहाचा संघर्ष फक्त अन्नासाठी नसतो तर जगण्यासाठी देखील असतो. जंगलात राहणाऱ्या सिंहासमोरही अनेकदा निसर्ग अडथळे निर्माण करतो मग तो जंगलात पेटणारा वनवा असो किंवा खळखळ वाहणारी नदी. सिंहाला देखील निसर्गाने निर्माण केलेल्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सध्या एका सिंहाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. खळखळ वाहणारी नदी ओलंडताणाऱ्या सिंहाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा