Lions silky and shiny hairstyle viral video: तुम्हाला वन्य प्राण्यांचे आणि जंगलातील व्हिडीओ पाहायला आवडत असतील, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण रानावनात भटकून प्राण्यांसह माणसांची शिकार करणाऱ्या एका सिंहाचा अनोखा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खुंखार शिकार करणाऱ्या सिंहाला पाहून सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहतो. पण या सिंहाने इंटरनेटवर नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. त्याचं कारणंही तितकच खास आहे. माणसांना केसांना सुंदर आकारात आणि सिल्की ठेवायला प्रचंड आवडतं. काही जण हजारो रुपये खर्च करून केसांना सुबक आखणी देत असतात. पण हा सिंह ना कोणत्या सलूनमध्ये जातो आणि ना कोणता शॅम्पू लावतो. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओत सिंहाचे सिल्की-शायनी केस पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

सिंहाच्या जबरदस्त व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली

केनियाच्या मसाई मारा प्रदेशातील एका सिंहाचा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @Gabriele_corno नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. १६ सेकंदांच्या हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजला आहे. कारण व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत ४.६ मिलियनहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर ७६ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, सामान्य दिवशी सिंह कशाप्रकारे दिसतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. या सिंहाकडे जबरदस्त स्वॅग आणि अटिट्यूड आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “त्याला सिंह असल्याचं भान आहे, हेच खूप सुंदर आहे.” तर अन्य एका नेटकऱ्याने सिंहाची खिल्ली उडवत म्हटलं, “कोणता शॅम्पू लावतो?

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

इथे पाहा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सिंह एका बाकावर विश्रांती घेताना दिसत आहे. सिंह ऐटीत बसून आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत आहे. सोसाट्याचा वारा सुटल्यानं सिंहाचे सिल्की-शायनी केस हवेत उडताना दिसत आहेत. ही सुंदर दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एरव्ही सिंहाला शिकार करताना व्हिडीओंच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. पण हा सिंह एखाद्या मॉडेलसारखा अॅटिट्यूड ठेऊन मस्त ऐटीत बसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. सिंहाच्या या व्हिडीओनं तमाम नेटकऱ्यांची मनं जिकंली असून सुंदर प्रतिक्रिया द्यायला त्यांना भाग पाडलं आहे.

Story img Loader